तांदळाची इडली खाऊन वैताग आला आहे? मग लोह आणि कॅल्शियमने समृद्ध असलेली नाचणी इडली नक्कीच बनवून पहा
सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकाला काहींना काही नवीन पदार्थ खाण्यास हवे असतात. नेहमीच कांदापोहे, उपमा, शिरा किंवा पराठा खाऊन सगळ्यांचं खूप जास्त कंटाळा येतो. अशावेळी विकतचे पदार्थ आणून खाल्लेले जातात. पण नेहमीच तिखट आणि तेलकट पदार्थ खाणे शरीरासाठी धोक्याचे ठरू शकतात. नाश्त्यात कायमच पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतात. कामाच्या धावपळीमध्ये बऱ्याचदा सकाळचा नाश्ता बनवण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. उपाशी पोटी बाहेर पडल्यामुळे शरीराला गंभीर आजारांची लागण होऊ शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला झटपट नाचणी इडली बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. नाचणी शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर मानली जाते. कॅल्शियम, लोह आणि फायबरने समृद्ध असलेली नाचणी वजन कमी करण्यासोबतच मधुमेहासाठी सुद्धा फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया नाचणीची इडली बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






