२० मिनिटांमध्ये बनवा खमंग पौष्टिक फुटाणे
लहान मुलं घरी असल्यानंतर त्यांना सतत भूक लागत राहते किंवा काहींना काही खाण्याची इच्छा होते. अशावेळी मुलांना पालक बाहेर मिळणारे चविष्ट पण आरोग्यासाठी हानिकारक असलेले पदार्थ खाण्यासाठी देतात. सतत तेलकट तिखट पदार्थ खाल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. लहान मुलांना सतत बाहेरचे पदार्थ खाण्याची सवय लागली की ती लवकर कमी होत नाही. त्यामुळे विकतचे पदार्थ खायला देण्यापेक्षा घरी बनवलेले घरगुती पदार्थ खायला द्यावेत. असे पदार्थ जे खाल्ल्याने मुलांचे पोटही भरेल आणि आरोग्याला सुद्धा फायदे होतील. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये खमंग पौष्टिक फुटाणे कसे बनवावे, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. घरी बनवलेले फुटाणे अधिककाळ चांगले टिकून राहतात. चला तर जाणून घेऊया फुटाणे बनवण्याची सोपी रेसिपी.






