हिमोग्लोबिन वाढवणारी बीटरूटची चटणी
शरीरात लोहाची कमतरता निर्माण झाल्यानंतर सगळ्यात आधी बीटरूट किंवा डाळिंब खाण्याचा सल्ला दिला जातो. पण लहान मुलांसह मोठ्यांसुद्धा बीटरूट खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही मुलांना बीटरूट पासून बनवलेली चटणी किंवा इतर पदार्थ बनवून देऊ शकता. बीटरूमध्ये अनेक गुणकारी गुणधर्म आढळून येतात. बीटमध्ये सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस आणि इतर अनेक पोषक घटक आढळून येतात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढून आरोग्य चांगले राहते. बीट खाणे त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. बीटमध्ये मुबलक प्रमाणात लोह आढळून येते. शरीरातील रक्तातील कमतरता भरून काढण्यासाठी आहारात बीटचा समावेश करणे आवश्यक आहे. शरीरातील रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात बीटरूटचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये बीटरूटची चटणी कशी बनवावी, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: हेअरमास्क किंवा तेलाचा वापर न करता केसांच्या वाढीसाठी नियमित प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक