कमी तेलाचा वापर करत उपवासाच्या दिवशी बनवा साबुदाणा आप्प्पे
आज नवरात्री उत्सवाचा सहावा दिवस आहे. या नऊ दिवसांमध्ये सगळीकडे वेगळाच आनंद आणि उत्साह असतो. नऊ दिवस देवीची मनोभावे पूजा करून देवीला अनेक वेगवेगळ्या गोड पदार्थांचा नैवेद्या दाखवला जातो. तसेच मनोभावे देवीची पूजा करून प्रार्थना केली जाते. नवरात्रीमध्ये अनेक लोक नऊ दिवस उपवास करतात. या दिवसांमध्ये केलेला उपवास आरोग्यासाठी अतिशय चांगला असतो. त्यामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये उपवास करावा. उपवास म्हटलं की सगळ्यांच्या घरी साबुदाण्याची खिचडी किंवा बटाट्याची भाजी हे ठराविक पदार्थ बनवले जातात. काहीवेळा हे पदार्थ खाल्ल्यामुळे पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे उपवासाच्या दिवशी पचनास हलके आणि पौष्टिक पदार्थ खावेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला उपवासाचे साबुदाणा आप्पे कसे बनवावे, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
हे देखील वाचा: १० मिनिटांमध्ये बनवा उपवासाचा कुरकुरीत डोसा, वाचा इन्स्टंट रेसिपी