उपवासाच्या दिवशी सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवा उपवासाचे कुरकुरीत कटलेट्स
महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास केला जातो. यादिवशी भगवान शंकराची मनोभावे पूजा करून नंतर उपवास सोडला जातो. उपवासाच्या दिवशी सर्वच घरांमध्ये साबुदाणा खिचडी, भगर, शेंगदाण्याची आमटी किंवा साबुदाणे वडे इत्यादी पदार्थ बनवले जातात. मात्र नेहमी नेहमी तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते, अशावेळी तुम्ही उपवासाचे कुरकुरीत कटलेट्स बनवू शकता. हे बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी साहित्यामध्ये तुम्ही उपवासाचे कटलेट्स बनवू शकता. तुम्ही बनवलेले कटलेट्स लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडतील. याशिवाय उपाशी पोटी साबुदाण्याच्या खिचडीचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही उपवासाच्या दिवशी कुरकुरीत कटलेट्स बनवू शकता. चला तर जाणून घेऊया सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
Masala Pav: स्ट्रीट फूड लव्हर्ससाठी खास 15 मिनिटांची रेसिपी, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल
उन्हाळ्यासाठी वाळवणीच्या पदार्थांमध्ये सोप्या पद्धतीत बनवा बटाट्याचे पापड, नोट करा रेसिपी