उन्हाळ्यासाठी वाळवणीच्या पदार्थांमध्ये सोप्या पद्धतीत बनवा बटाट्याचे पापड
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सर्वच घरांमध्ये पापड, सांडगे, लोणचं, कुरडया इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. पापड हा पदार्थ लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडतो. जेवणात तोंडी लावण्यासाठी पापडचे सेवन केले जाते. याशिवाय उपवासाच्या दिवशी बटाटा किंवा साबुदाण्याचे पापड खाल्ले जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये बटाट्याचे पापड बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे पापड तुम्ही पंख्याखाली सहज सुकवू शकता. कारण शहराच्या ठिकाणी पापड किंवा वाळवणाचे पदार्थ सुकवण्यासाठी जास्त जागा नसते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पंख्याखाली सुकवता येतील अशा पापडाची रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया बटाट्याचे पापड बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
चवीला बेचव लागणाऱ्या ओट्सपासून सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट ओट्स खीर, वाचा सोपी रेसिपी