उपवासाच्या दिवशी शरीरातील कमी झालेली ऊर्जा वाढवण्यासाठी नाश्त्यात बनवा रताळ्याचा किस
आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी महिला उपवास करतात. उपवास करून शंकराची मनोभावे पूजा केली जाते. याशिवाय या महिन्यात अनेक घरांमध्ये पूजापाठ, व्रत, शांती इत्यादी अनेक धार्मिक सोहळे असतात. उपवासाच्या दिवशी बराच वेळ कोणत्याही पदार्थांचे सेवन न केल्यामुळे शरीरातील ऊर्जा काहीशी कमी होऊन जाते. सतत थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. अशावेळी शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी पौष्टिक आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये रताळ्याचा किस बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला रताळ्याचा किस चवीला अतिशय सुंदर लागतो. याशिवाय वाढलेले वजन कमी करतानासुद्धा रताळ्याचे सेवन केले जाते. चला तर जाणून घेऊया रताळ्याचा किस बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
श्रावण कांदा लसूणचा वापर न करता झटपट बनवा झणझणीत मसूर आमटी, वाफाळत्या भातासोबत लगेच चविष्ट






