श्रावण कांदा लसूणचा वापर न करता झटपट बनवा झणझणीत मसूर आमटी
जेवणातील पदार्थांमध्ये डाळ, आमटी हे पदार्थ नेहमीच बनवले जातात. भात किंवा चपतीसोबत खाण्यासाठी आमटी बनवली जाते. आमटी बनवताना त्यात कांदा, लसूण, आलं इत्यादी अनेक पदार्थांचा वापर केला जातो. या पदार्थांच्या वापरामुळे पदार्थाची चव वाढण्यास मदत होते. पण श्रावण महिन्यातील नैवेद्यामध्ये कांदा, लसूणचा वापर केला जात नाही. म्हणून आज आम्ही तुम्हाला कांदा लसूण न वापरता झणझणीत चविष्ट आमटी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मसूरच्या डाळीचा वापर करून बनवलेली आमटी चवीला अतिशय सुंदर लागते. गरमागरम भाकरी किंवा भातासोबत मसूर डाळीची आमटी अतिशय चविष्ट लागते. श्रावण महिन्यात नैवेद्याच्या जेवणातील पदार्थांमध्ये तुम्ही मसूर डाळीची आमटी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया मसूर डाळीची आमटी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)






