श्रावणी सोमवारच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट गोड रताळ्याची खीर
श्रावण महिन्यातील आज शेवटचा सोमवार आहे. या महिन्यात अनेक लोक उपवास करतात. श्रावणात केलेला उपवास आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. या दिवसांमध्ये शंकराची मनोभावे पूजा करून व्रत किंवा पूजेचे आयोजन केले जाते. उपवास केल्यानंतर घरातील देवांना नैवेद्य बनवून दाखवला जातो. नैवेद्यामध्ये प्रामुख्याने शेवयांची खीर, शिरा किंवा साबुदाणा खीर बनवली जाते. पण कायमच शेवयांची खीर खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये रताळ्याची खीर बनवू शकता. रताळी खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. उपवासाच्या दिवशी अनेक घरांमध्ये रताळ्यांपासून बनवलेले पदार्थ खाल्ले जातात. रताळ्यांमध्ये फायबर्स, विटामिन ए, विटामिन सी आणि बी-6, पोटॅशियम, मॅग्ननिज इत्यादी अनेक घटक आढळून येतात. चला तर जाणून घेऊया रताळ्याची खीर बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा हॉटेल स्टाईल Chili paneer Frankie