घरी व्हिगन तूप कसे बनवावे (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/iStock)
How to make Dairy free Ghee: तूप खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, परंतु काही लोक तुपाच्या सेवनाने वजन वाढू शकते असा विचार करून ते सेवन करत नाहीत. पण असं नाहीये, मर्यादित प्रमाणात तूप खाल्ल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळतात. काही लोक बाजारात मिळणारे तूप खातात, तर काही लोक घरी दुधाच्या सायीपासून शुद्ध तूप तयार करतात. मात्र आजकाल बाजारात मिळणाऱ्या वस्तूंमध्ये खूप भेसळ आहे.
विशेषतः, उघड्यावर मिळणारे तूप खाणेदेखील हानिकारक असू शकते. आतापर्यंत तुम्ही घरी सायीपासून तूप बनवले असेल, पण कधीकधी दूध इतके पातळ असते की सायही येत नाही. आज आम्ही तुम्हाला तूप बनवण्याची एक अगदी नवीन पद्धत सांगत आहोत, ज्याबद्दल तुम्ही कधीच विचार केला नसेल की तूप असेदेखील बनवता येते. सध्या Vegan खाणाऱ्यांची संख्या वाढली आहे, त्यासाठी ही रेसिपी परफेक्ट ठरेल
सायीशिवाय शुद्ध तूप कसे बनवायचे
यामध्ये तुम्हाला दूध किंवा क्रीमची गरज भासणार नाही. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर तूप बनवण्याची एक अनोखी पद्धत सांगितली आहे, जी बनवल्याशिवाय तुम्हाला विश्वासच बसणार नाही. ते इन्स्टाग्रामवर @peepalfarmproducts नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आले आहे. यामध्ये, इन्स्टाग्राम इन्फ्लुएंसर शिवानी सिंह डेअरी-फ्री व्हेगन तूप बनवण्याची एक अतिशय सोपी युक्ती सांगत आहे.
तूप खाण्याचे 7 फायदे, वाचाल तर नक्की खाल
काय वापरावे साहित्य
व्हिगन तूप बनविण्याची रेसिपी
हे घरगुती तूप आरोग्यदायीदेखील आहे. तुम्ही हे पराठ्यावर किंवा चपातीवर लावू शकता. तुम्ही दुधाच्या सायीने तयार झालेल्या तुपामध्ये जे काही बनवता तेच या घरी बनवलेल्या डेअरी फ्री तुपामध्येदेखील बनवू शकता. बऱ्याच प्रमाणात त्याची चव तूपासारखीच लागते हेदेखील शिवानीने आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.
कोमट पाण्यात तूप मिक्स करून प्यायल्यास आरोग्याला होतील आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या सविस्तर
शिवानीची तुपाची रेसिपी
तुम्हीही घरी व्हिगन तूप करून खाऊ शकता. यामुळे वजनवाढ होत नाही आणि तुमच्या शरीराला तुपाचेच योग्य फायदे मिळण्यास मदत मिळते. याशिवाय गाईच्या दुधाप्रमाणेच हे तूपही रवाळ असते आणि चवीलाही त्याप्रमाणेच लागते असे या व्हिडिओत सांगण्यात आले आहे.






