पार्टी स्नॅकसाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा Garlic Cheese Bread
सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर मुलांना काहींना काही चमचमीत पदार्थ खाण्यास हवे असतात. कायमच कांदापोहे, उपमा, शिरा किंवा साऊथ इंडियन पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही गार्लिक चीज ब्रेड बनवून खाऊ शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चव सुद्धा चांगली लागते. भरपूर चीज आणि लसूण घालून बनवलेला पदार्थ लहान मुलांसह मोठेसुद्धा खूप जास्त आवडीने खातील. गार्लिक चीज ब्रेड कायमच कॅफेमधून किंवा पिझ्झा हब मधून ऑर्डर केला जातो. पण नेहमीच विकतचे पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेले टेस्टी आणि हेल्दी पदार्थ खावेत. लसूण खाल्ल्यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात. लसूणमध्ये असलेले गुणकारी घटक शरीर स्वच्छ करण्यास मदत करतात. याशिवाय लहान मुलांच्या पार्टीसाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅकसाठी तुम्ही गार्लिक चीज ब्रेड बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






