दुपारच्या जेवणात भाजी काय बनवावी सुचत नाही? मग ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट कांद्याची भाजी, नोट करा रेसिपी
जेवणाच्या ताटात नेहमीच काय भाजी बनवावी? असा प्रश्न सर्वच महिलांना कायम पडतो. नेहमीच त्याच ठराविक भाज्या खाऊन सगळ्यांना खूप जास्त कंटाळा येतो आणि काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चविष्ट कांद्याची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली कांद्याची भाजी चवीला अतिशय सुंदर लागते आणि चार घास जास्त जातात. गरमागरम कांद्याची भाजी चपाती, भाकरी किंवा वाफाळत्या भातासोबत अतिशय सुंदर लागते. लहान मुलांपासून मोठेसुद्धा भाजीमधील कांदा बाजूला काढून टाकतात. त्यामुळे मुलांच्या शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही. त्यामुळे मुलांना या पद्धतीने कांद्याची भाजी बनवून खाण्यास द्यावी. कांद्याचा वापर जेवणातील सर्वच पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. यामुळे पदार्थाची चव वाढते आणि शरीराला सुद्धा फायदे होतात. चला तर जाणून घेऊया कांद्याची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
Recipe : झणझणीत अस्सल गावरान चवीचा कोल्हापूरी तांबडा रस्सा कसा बनवायचा? रेसिपी नोट करा






