Tambda Rassa Recipe : झणझणीत अस्सल कोल्हापूरी चिकन तांबडा रस्सा खायचाय? अहो मग हाॅटेल कशाला... घरातच बनवा तांबड्या रशाची मेजवाणी. याची चव कुस्करलेल्या भाकरीसोबत अप्रतिम लागते.
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
तांबडा रस्सा म्हणजे कोल्हापूरची शान.
कोल्हापूरच्या लोकप्रिय पदार्थांमध्ये या डिशचा समावेश आवर्जून येतो.
चिकनचा हा तांबडा रस्सा एकदम झणझणीत तिखट चवीचा असतो.
महाराष्ट्रातील कोल्हापूर हे शहर आपल्या झणझणीत आणि मसालेदार खाद्यसंस्कृतीसाठी संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे. या खाद्यपरंपरेत सर्वाधिक लोकप्रिय असलेला पदार्थ म्हणजे कोल्हापुरी स्टाईल चिकन तांबडा रस्सा. या रस्स्याचे वैशिष्ट्य म्हणजे भाजलेल्या सुगंधी मसाल्यांचा वापर. कोल्हापुरी पद्धतीने बनवलेला तांबडा रस्सा जितका तिखट तितकाच चविष्ट असतो. भाकरी, ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी किंवा गरमागरम भातासोबत हा रस्सा अप्रतिम लागतो. घरी योग्य प्रमाणात मसाले वापरून हा पदार्थ सहज तयार करता येतो. सण-समारंभ, पाहुणचार किंवा रविवारी खास जेवणासाठी ही रेसिपीनक्की करून पाहा.
कढईत सुके खोबरे, धने, जिरे, काळी मिरी, लवंगा, दालचिनी, लाल मिरच्या आणि अर्धा कांदा मंद आचेवर छान भाजून घ्या. थंड झाल्यावर त्यात आले, लसूण आणि थोडे पाणी घालून बारीक वाटून मसाला तयार करा.
जाड बुडाच्या भांड्यात तेल गरम करून उरलेला कांदा सोनेरी होईपर्यंत परता. त्यानंतर तयार केलेला मसाला घालून तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्या.
आता हळद, लाल तिखट आणि मीठ घालून मसाल्यात स्वच्छ धुतलेले चिकन मिसळा. ८ ते १० मिनिटे मध्यम आचेवर परतून चिकन मसाल्यात मुरू द्या.
आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून रस्सा तयार करा. झाकण ठेवून २५ ते ३० मिनिटे किंवा चिकन पूर्ण शिजेपर्यंत मंद आचेवर शिजवा.
रस्सा उकळल्यानंतर चव तपासा. आवश्यक असल्यास मीठ किंवा तिखट समायोजित करा आणि रस्सा आणखी काही मिनिटे उकळू द्या, जेणेकरून मसाल्यांचा स्वाद चांगला मुरेल.
गॅस बंद करून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरा. काही मिनिटे झाकून ठेवल्यास रस्स्याची चव अधिक खुलते.