जेव्हा साडी किंवा ओढणी जोरात ओढल्या जाते तेव्हा पदराचा किंवा ओढणीचा भाग पिनला असलेल्या गोलकार भागात अडकून बसतो. आणि तिथून तो काढणं खूप अवघड असतं. कारण तो हमखास फाटतोच.
सणावाराचे दिवस आले की पटापट कपाटातून महागड्या साड्या, भारीभारीचे ड्रेस बाहेर निघतात. महागड्या साड्यांचे नाजूक पदर आणि भरजरी ओढण्या सांभाळताना अनेकींना नाकी नऊ येतात. कारण साडी किंवा ओढणी जेवढी महागडी तेवढा तिच्यात अधिक जीव असतो. म्हणूनच तर ती आपण अगदी जपून वापरतो. कधी कधी मात्र पदर- ओढणी कुठेतरी अडकून खचकन ओढल्या जाते आणि पदराला किंवा ओढणीला ज्या जागी पिन लावलेली असते, त्याठिकाणी ती फाटते. असं होऊ नये, यासाठी डॉली जैन यांनी एक सोपा उपाय सांगितला आहे.
पिनमध्ये अडकून साडी- ओढणी फाटू नये म्हणून
महागड्या साड्यांच्या पदरांना किंवा भरजरी ओढण्यांना आपण बऱ्याचदा सांभाळत- घाबरत साडी पिन लावतो. कारण पदर किंवा ओढणी चुकून ओढल्या गेलीच तर ती फाटण्याची भिती असते.
साडीला आपण जी सेफ्टी पिन लावतो, त्या पिनेच्या खालच्या टोकाला एक गोलाकार भाग असतो. जेव्हा साडी किंवा ओढणी जोरात ओढल्या जाते तेव्हा पदराचा किंवा ओढणीचा भाग पिनला असलेल्या गोलकार भागात अडकून बसतो. आणि तिथून तो काढणं खूप अवघड असतं. त्यासाठी सेफ्टी पिन घ्या त्या मध्ये मणी त्या पिन मध्ये घाला त्यानंतर ती पिन साडी ला लावा त्यामुळे साडी पाटण्याची भिंती नाही.






