फोटो सौजन्य - Social Media
सध्या देशभरात सन उत्सवांचे वातावरण आहे. एका पाठोपाठ एक सण येत आहेत. दिवाळीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. दिवाली म्हणजे उजाळ्यांचा सण, देशभरात जिथे नजर जाईल तिथे प्रकाशच प्रकाश दिसतो. या काळात अंतरिक्षातून भारत आकर्षक असा दिसतो. या काळामध्ये भारताची ख्याती वेगळीच असते. दिवाळी पाहण्यासाठी अनेक परदेशी पाहुणे भारतामध्ये येत असतात. त्या काळामध्ये घरोघरी फराळ बनवला जातो. मिठाई बनवली जातात. माणसाचे पोट दिवसात अगदी टवटवीत असते. घरोघरी रोज गोडाधोडाचे बेत असते. खवयांचे जिभेचे चोचले या दिवसात मोठ्या प्रमाणात पुरवले जातात. अनेक लोक आपली डायटिंग विसरून या दिवसात सणाचा मनमुराद आनंद लुटत असतात.
हे देखील वाचा : वाढत्या प्रदूषणामुळे खोकला लागला आहे? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पहा, खोकला होईल कमी
दरम्यान, दिवाळीच्या सणात समोर इतके मस्त मिठाई असल्यावर कुणाला आवरणार ही कसं? सगळेजण त्या मिठायांचे मनमुराद आनंद घेत असतं. परंतु याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर दिसून येतो. मोठ्या प्रमाणात साखरेची उपस्थिती असलेले खाद्यपदार्थ खाल्ल्याने शरीरातील शुगर वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण किती सेवन करत आहोत? याचेही भान असणे गरजेचे असते. तरी अशा काही टिप्स आहेत, यांचे अनुसरण करून आपण मिठाईंपासून आपल्या आरोग्याचे बचाव करू शकतो.
दिवाळीच्या दिवसात आपल्या सेवनात साखरेचे प्रमाण कमी करावे. बेकरी पासून बनलेले खाद्यपदार्थ, चॉकलेट्स किंवा इतर स्नॅक्स यांच्यापासून जरा लांबच राहावे. कमीत कमी एक आठवडा तरी या गोष्टींचे सेवन करणे टाळावे. दिवसात पाण्याचे सेवन जास्त ठेवावे. जर काही गोडाचं खाण्याचा मन झालं तर सरळ पाणी प्यावे. कमीत कमी दोन ते तीन लिटर दिवसातून पाणी प्यावे. दररोज नियमितपणे व्यायाम करावा. व्यायाम केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. जमले तर रोज चालण्यास जावे किंवा नृत्य करावे. जितकी हालचाल होईल तितके शरीरासाठी चांगले असते.
हे देखील वाचा : हिवाळ्यात घरीच बनवा होममेड बॉडी लोशन,थंडीमध्ये त्वचा राहील मुलायम आणि नितळ
दिवाळीच्या दिवसात सॅलेड खाणे कधी उत्तम असते. कारण आपण खात असलेल्या मिठाईमुळे आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. त्यावर नियंत्रण म्हणून अशा भाज्या ज्यांच्यामध्ये कॅलरी कमी असतात आणि पोषक तत्व जास्त असतात त्यांचे सेवन करावे. अशा मध्ये जर स्नॅक्स खाण्याचे मन झाले तर प्रोटीन युक्त स्नॅक्स खावे. यामध्ये डाळी पासून बनलेले स्नॅक्स किंवा पनीर टिक्का तसेच ग्रिल्ड चिकन खाऊ शकता. शक्यतो मिठाईंचे सेवन जेवणानंतर करावे. यास कारण की जेवणानंतर आपले पोट पूर्वीपासूनच भरलेले असते त्यामुळे जास्त खाण्याची इच्छा होत नाही आणि आपण मर्यादेमध्ये राहून गोड खातो. याने आरोग्यावर परिणामही होत नाही. या बाबींचे अनुसरण करून आपण आपल्या आरोग्यावर नियंत्रण ठेवू शकतो.