(फोटो सौजन्य: istock)
हे आहे जगातील शेवटचे गाव; इथे नाही मरण्याची परवानगी… नेहमीच असतो रात्रीचा अंधार
सरकारच्या मते, हा आर्टिफिशियल बीच हैदराबादसाठी एक नवे पर्यटन आकर्षण ठरेल. येथे केवळ वाळू आणि पाणीच नाही, तर पर्यटकांसाठी संपूर्ण मनोरंजनाची मेजवानी उपलब्ध असेल. या प्रकल्पात फ्लोटिंग व्हिला, लक्झरी हॉटेल्स, वेव्ह पूल, बंजी जंपिंग, सेलिंग व स्केटिंग सुविधा, सायकलिंग ट्रॅक, मुलांसाठी पार्क आणि खेळाची मैदाने, फूड कोर्ट्स व कॅफे, थिएटर तसेच म्युझिकल फाउंटन अशा अनेक आकर्षक सुविधा असतील. त्यामुळे कुटुंबासोबत वीकेंड घालवण्यासाठी हे ठिकाण एक परफेक्ट डेस्टिनेशन ठरेल.
कोटवाल गुडा परिसराची निवड यासाठी करण्यात आली आहे कारण तो बाह्य रिंग रोडजवळ असल्याने येथे पोहोचणे सोपे आहे. याशिवाय, प्रकल्पाच्या उभारणीदरम्यान पर्यावरण संरक्षणालाही प्राधान्य दिले जाणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तेलंगणा टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष पटेल रमेश रेड्डी यांच्या माहितीनुसार, या प्रकल्पाची डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट (DPR) तयार असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. तेलंगणा राज्यात पर्यटन विकासासाठी मोठी संधी असल्याचे सरकारचे मत असून, हा आर्टिफिशियल बीच प्रकल्प राज्याच्या पर्यटन अर्थव्यवस्थेला नवी चालना देईल. स्थानिक नागरिकांसह देश-विदेशातील पर्यटकांनाही हा प्रकल्प आकर्षित करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.






