केसांच्या वाढीसाठी महागडे प्रॉडक्ट वापरण्यापेक्षा खोबरेल तेलात मिक्स करा 'हे' पदार्थ
बदललेले वातावरण, धूळ, माती, प्रदूषण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम जसा आरोग्यावर, त्वचेवर दिसून येतो, तसाच परिणाम केसांच्या वाढीवर सुद्धा दिसून येतो. हल्ली लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे केस मोठ्या प्रमाणावर गळतात. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर बऱ्याचदा महिलांसह पुरुष देखील दुर्लक्ष करतात. पण सतत दुर्लक्ष केल्यामुळे केसांमध्ये टक्कल पडण्याची जास्त भीती असते. केस गाळून पातळ झाल्यानंतर महिला सतत काहींना काही उपाय करतात. कधी केमिकल युक्त हेअर ऑइल लावले जाते तर कधी हेअरमास्क किंवा हेअर स्पा करून केसांची काळजी घेतली जाते. पावसाळ्यात केसांमध्ये कोंडा वाढण्याची शक्यता असते. यामुळे केस जास्त प्रमाणात तुटू लागतात. अशावेळी तुम्ही खोबऱ्याच्या तेलात कॅस्टर ऑइल मिक्स करून केसांवर लावू शकता. या तेलाच्या वापरामुळे केस गळणे थांबेल आणि केस तुटणार नाहीत.(फोटो सौजन्य – iStock)
केस गळती थांबवण्यासाठी महिला कॅस्टर ऑइलचा वापर करतात. मात्र कॅस्टर ऑइल थेट केसांवर लावू नये. हे तेल केसांवर थेट लावल्यामुळे केस गळतीची समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवते. याशिवाय केसांची गुणवत्ता खराब होते. त्यामुळे कॅस्टर ऑइल खोबऱ्याच्या तेलात मिक्स करूनच लावावे. कॅस्टर ऑइलमध्ये विटामिन ई, ओमेग 6 फॅटी अॅसिड आणि रिसिनोलेक अॅसिड इत्यादी अनेक गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे केसांमधील कोंडा कमी होतो आणि केसांचे तुटणे थांबते. डोक्याच्या त्वचेवरील रक्तभिसरण सुधारण्यासाठी या तेलाचा डोक्यावर हलक्या हाताने मसाज करावा. या तेलात अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी फंगल गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. ज्यामुळे केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी होतो.
खोबऱ्याच्या तेलाचा वापर मागील अनेक वर्षांपासून केला जात आहे. या तेलात असलेले गुणधर्म केसबी गळणे थांबतात. याशिवाय टाळूवरील इन्फेक्शनचा धोका कमी करण्यासाठी खोबऱ्याच्या तेलाचा वापर करावा. खोबऱ्याचे तेल नॅचरल मॉइश्चरायजर आहे. खोबऱ्याचे तेल आणि एरंडेल तेल एकत्र मिक्स करून लावल्यास केसांची वाढ झपाट्याने होईल आणि केस तुटणे थांबेल. केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारेल.
केसांच्या निरोगी वाढीसाठी खोबऱ्याचे तेल आणि एरंडेल तेल अतिशय गुणकारी आहे. या तेलाच्या वापरामुळे तुमच्या केसांची वाढ झपाट्याने होईल. याशिवाय केसांचे तुटणे सुद्धा थांबेल. यासाठी वाटीमध्ये खोबऱ्याचे तेल आणि एरंडेल तेल घेऊन मिक्स करा. तयार करून घेतलेले तेल केसांच्या मुळांपासून ते अगदी केसांच्या टोकांपर्यंत सगळीकडे लावा. त्यानंतर १ किंवा २ तास तेल केसांवर लावून ठेवा किंवा रात्रभर सुद्धा ठेवू शकता. या तेलाच्या वापरामुळे केस गळणे थांबेल.