खाज किंवा जळजळ झाल्यास उद्भवू शकतात आरोग्यासंबंधित गंभीर समस्या
वाढत्या वयानुसार शरीरात सतत काहींना काही बदल होत असतात. शरीरात होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष न करता योग्य ती काळजी घेत जीवन जगणे आवश्यक आहे. शरीरामध्ये कोणताही आजार झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये काहीच लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र कालातंराने हळूहळू आरोग्यासंबंधित अनेक समस्या जाणवण्यास सुरुवात होते. कोणताही आजार झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये थकवा जाणवणे, खाण्यापिण्याची इच्छा न होणे, आवाजात बदल, पोटात बदल, त्वचेचा रंग बदलणे, छातीत दुखणे किंवा दाब, झोपेचा त्रास, वजन वाढणे, पायांवर सूज येणे इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. मात्र या लक्षणांकडे काहीवेळा दुर्लक्ष केले जाते. असे केल्यामुळे शरीरात झालेला आजार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य वेळी लक्ष देऊन आरोग्याची नीट काळजी घ्यावी.(फोटो सौजन्य-istock)
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
शरीरात बदल होऊ लागल्यानंतर प्रामुख्याने जाणवू लागणारी समस्या म्हणजे अंगाला खाज येणे. अंगाला खाज येऊ लागल्यानंतर अनेकदा दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. शरीराच्या ठराविक भागांमध्ये सतत खाज येण्यास सुरुवात झाल्यानंतर योग्य वेळी लक्ष देऊन मोठे आजारांपासून शरीराचं बचाव करावा. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीराच्या कोणत्या अवयवांवर खाज आल्यानंतर दुर्लक्ष करू नये, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
अनेकदा पोटाला खाज आल्यानंतर काही लोक दुर्लक्ष करतात. मात्र असे केल्यामुळे आरोग्य आणखीन बिघडण्याची शक्यता असते. पोटाला खाज आल्यानंतर यकृत किंवा पित्त मूत्राशयाशी संबंधित आजार असण्याची शक्यता असते. हिपॅटायटीस, पित्ताशयातील खडे किंवा इतर यकृत रोगांमुळे पोटावर खाज येते. पोटावर खाज येण्यास सुरुवात झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे.
हात पायांना खाज येणे हे त्वचेसंबंधित समस्यांचे लक्षणं असू शकते. बुरशीजन्य संसर्ग झाल्यानंतर हातापायांच्या बोटांना आणि त्वचेवर खाज येऊ लागते. त्वचेवर खाज आल्यानंतर सूज, चिडचिड किंवा लालसरपणा ही लक्षणे दिसू लागतात. त्वचेसंबंधित कोणत्याही समस्या उद्भवू लागल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
त्वचेला खाज येणे हे जळजळ, ऍलर्जी किंवा एक्जिमा, सोरायसिस इत्यादी गंभीर आजाराचे लक्षण असण्याची शक्यता असते. तसेच यकृत किंवा मूत्रपिंडाच्या आजारांसारख्या अंतर्गत समस्यांमुळे त्वचेवर खाज येते. त्वचेवर खाज येण्यास सुरुवात झाल्यानंतर त्वचा लाल होऊन जाते. अंगाला खाज सुटण्यास सुरुवात झाल्यानंतर योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.






