सतत लिपस्टिक लावून काळवंडलेले ओठ काही क्षणात होतील गुलाबी!
चेहऱ्याच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी ओठांना सुंदर लिपस्टिक लावली जाते. यामुळे त्वचेचे सौंदर्य अधिक उठावदार आणि सुंदर दिसते. मेकअप करताना काहींना काजळ लावण्याची सवय असते, तर काहींना नेहमीच लिपस्टिक लावण्याची सवय असते. बाजारात अनेक वेगवेगळ्या ब्रॅण्डच्या आणि रंगाच्या लिपस्टिक उपलब्ध आहेत. बाहेर फिरायला जाताना मेकअप केल्यानंतर ओठांना लिपस्टिक, डोळ्यांना काजळ आयशॅडो इत्यादी अनेक गोष्टी लावल्या जातात. मात्र ओठांना वारंवार लिपस्टिक लावणे धोक्याचे ठरू शकते. कारण लिपस्टिक तयार करताना हानिकारक रसायनांचा वापर केला जातो. यामुळे ओठ कोरडे पडणे, ओठांची त्वचा काळी होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात.(फोटो सौजन्य – istock)
ओठ काळवंडलेले आणि काळे दिसण्यासाठी सुरुवात झाल्यानंतर मुली बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या लीप बामचा वापर करतात. लीप बाम लावल्यामुळे ओठ हायड्रेट राहतात. याशिवाय काळे झालेले ओठ पुन्हा एकदा गुलाबी करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. मात्र तरीसुद्धा ओठ चांगले दिसत नाहीत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ओठांची खराब झालेली त्वचा गुलाबी करण्यासाठी घरगुती लीप मास्क बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
लीप मास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये कोरफड जेल घेऊन त्यात मध, बीटरुट पावडर घालून सर्व साहित्य चमच्याने मिक्स करून घ्या. त्यानंतर तयार केलेल्या मिश्रणात खोबऱ्याचे तेल घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेले मिश्रणात बंद बाटलीमध्ये भरून ठेवा. हा लीप बंद काचेच्या बरणीमध्ये ठेवल्यास महिनाभर व्यवस्थित टिकून राहील.
केसांमध्ये वाढलेला कोंडा कायमचा होईल नष्ट! शँम्पूमध्ये मिक्स करा ‘हे’ औषधी पाणी, केस होतील स्वच्छ
तयार केलेला लीप मास्क हातांवर घेऊन रात्री झोपण्याआधी संपूर्ण ओठांवर लावून घ्या. त्यानंतर हलक्या हाताने ओठांवर मसाज करा. २ तो मिनिटं ओठांवर मसाज केल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून टाका. हा उपाय रात्री झोपण्याआधी नियमित केल्यास ओठांवर जमा झालेली डेड स्किन कमी होईल. याशिवाय ओठ चमकदार आणि गुलाबी दिसू लागतील. ओठांच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी वापरली जाणारी लिपस्टिक बऱ्याचदा आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी अतिशय घातक ठरते. यामुळे ओठांचे नुकसान होते.