खोडकंदाचा कसा कराल उपोयग घ्या जाणून (फोटो सौजन्य - iStock)
मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्हा जंगलांसाठी ओळखला जातो. या जिल्ह्यातील सुमारे ५३% भूभाग जंगलांनी व्यापलेला आहे. अशा परिस्थितीत, जंगलांशी संबंधित अनोख्या गोष्टी येथे आढळतात. बालाघाटचे लोक वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीचा आनंद घेतात. प्रोटीनसाठी बरेचदा मटण आणि चिकनचा अनेक जण वापर करतात. मात्र मध्यप्रदेशता मिळणारी अशीच एक भाजी आहे, जी स्थानिक लोक खोडकंद म्हणून ओळखतात.
महाराष्ट्रातील लोकांना कदाचित या भाजीची ओळख नसेल. मात्र विविध प्रदेशातील भाज्यांबद्दल माहिती घ्यायची झाली तर प्रोटीनसाठी ही भाजी नक्कीच खूप चांगली ओळखली जाते. खोडकंद हे नाव अनेकांसाठी नवीन असेल. पण या भाजीचे नक्की काय फायदे आहेत आणि कशा पद्धतीने ही भाजी वापरावी याची माहिती एका हिंदी संकेतस्थळाने दिली आहे, आपणही याची माहिती करून घेऊया (फोटो सौजन्य – iStock)
भाजीचे वैशिष्ट्ये
बालाघाटच्या ग्रामीण भागात खोडकंद भाजी मोठ्या आवडीने खाल्ली जाते आणि विशेष म्हणजे त्याची लागवडही मोठ्या आवडीने केली जाते. पूर्वी ते फक्त घरगुती वापरासाठीच लागवड केले जात होते, परंतु आता त्याची मागणी इतकी वाढली आहे की त्याची व्यावसायिकरित्या लागवड केली जात आहे असे सांगण्यात येते. जमिनीच्या खाली ही भाजी वाढते आणि कशा पद्धतीने याचा वापर होतो आपण जाणून घेऊया
जमिनीत वाढते भाजी
लोक खोडकंद खूप आवडीने खातात. ते अगदी लाकडासारखे दिसते. त्या लाकडाला खोड म्हणतात. जमिनीच्या आत वाढणारा कंद. म्हणूनच या भाजीला खोडकंद म्हणतात. ही भाजी जमिनीत सुमारे २-३ फूट खोलवर वाढते. या भाजीचा कंद देखील सुमारे १ फूट लांब आहे, जो पूर्णपणे लाकडासारखा आहे. या भाजीची एक वेगळी चव असल्याचेही सांगितले जाते.
चिकनपेक्षाही अधिक प्रोटीन
ही भाजी चिकनला जोरदार टक्कर देते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रत्यक्षात, चिकनची किंमत २४० रुपये प्रति किलो आहे. त्याच वेळी, खोडकंद ४० रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहे. जर आपण चवीबद्दल बोललो तर ही भाजी अगदी चिकनसारखीच चवीची लागते असे सांगण्यात येते. शाकाहारी लोकांना प्रोटीन हवे असेल तर ते चिकनला पर्याय म्हणून खोडकंदाचा वापर करून घेऊ शकतात.
केवळ 15 दिवसात कोलेस्ट्रॉलचा उडेल फज्जा, रोज सकाळी उपाशीपोटी खाल ‘हा’ मसाला; होईल कमाल
शिजवणे थोडे कठीण
ही भाजी शिजवण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. खरं तर, ते सोलण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्यावर सालीचा जाड थर असतो. त्यामुळे खोडकंद सोलण्यासाठी बराच वेळ लागतो. त्यानंतर त्याचे तुकडे केले जातात. हे तुकडे तेलात तळले जाते. यानंतर ते अनेक प्रकारच्या मसाल्यांमध्ये शिजवले जाते. त्याच्या चवीसोबतच, त्याची रस्सा तुम्हाला बोटे चाटायला भाग पाडतो. आता लग्नातही ही भाजी खाण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.