घरातील झुरळांना चुकीच्या पद्धतीने मारताय? आरोग्यासंबंधित वाढेल 'या' आजारांचा धोका
घराच्या खिडकीमध्ये, किचन, सोफा, कपाट इत्यादी अनेक ठिकाणी झुरळ पाहायला मिळतात. घरात झुरळांची पैदास झाल्यानंतर ती कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. पण झुरळांपासून सुटका करून घेण्याच्या नादात आपण अनेकदा परिस्थिती अधिकच बिघडवतो. कारण, चुकीच्या पद्धतीने झुरळ मारणे हे जिवंत झुरळापेक्षा अधिक हानिकारक असू शकते.डॉ. मुकेश संकलेचा, सल्लागार बालरोगतज्ज्ञ, बॉम्बे हॉस्पिटल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, यांनी याबद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे.
वैज्ञानिक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, झुरळांमुळे ई. कोलाय, साल्मोनेला आणि स्टॅफिलोकोकस ऑरियस अशा हानिकारक रोगांचे संक्रमण होऊ शकते. नुसत्या हातांनी, पायांनी किंवा घरातल्याच गोष्टींनी आपण जेव्हा त्यांना चिरडतो, तेव्हा याच रोगांचे जीवाणू जमिनीवर आणि भिंतींवर पसरण्याचा धोका असतो. त्यातच आपण मारलेले झुरळ हे केवळ समोर दिसत असतात. ते जिथे लपलेले असतात किंवा त्यांची अंडी याकडे आपले दुर्लक्ष होते. आणि काही दिवसांत पुन्हा नवीन झुरळे दिसू लागतात.
अनेक आजारांवर रामबाण उपाय! आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेला ‘हा’ पदार्थ सर्दी- खोकला करेल गायब
झुरळांचा नायनाट करण्यासाठी काही लोक स्वस्त उत्पादनांचा वापर करतात ज्यामुळे ऍलर्जी होण्याचा धोका असतो तसेच आरोग्य समस्या उद्भवू शकतात. काही लोक झुरळ किंवा कीटकांचा नाश करणाऱ्या अगरबत्तीसारख्या उपायांचा वापर करतात. मात्र, ते उपाय सुरक्षित नाहीत. अभ्यासातून असे समोर आले आहे की, अशा अगरबत्ती हनिकारक कर्करोगजन्य पदार्थ सोडतात. लहान किंवा जिथे हवा खेळती राहात नाही अशा घरांमध्ये, हा धूर मुले तसेच वृद्धांसाठी आरोग्याचे गंभीर धोके निर्माण करू शकतो.
झुरळांना मारणारे खडू हा नेहमीच सोपा उपाय म्हणून ओळखला जातो. परंतु ते झुरळांवर कुचकामी ठरतात. झुरळांना घालवण्यासाठी याचा वापर करायचा म्हणजे अनेक पृष्ठभागावर रेषा माराव्या लागतात. जे दिसायला घाण तर दिसतेच पण ते आरोग्यासाठी देखील धोकादायक ठरू शकते. हे खडू वापरताना सहजपणे तुटू शकतात आणि त्याची पावडर उडू शकते. त्यामुळे ही पावडर हातांच्या संपर्कात येऊन ठिकठिकाणी पडू शकते. यामुळे देखील धोका होऊ शकतो.
याशिवाय लिंबू, तमालपत्र आणि केरोसिनमध्ये भिजवलेले कापसाचे गोळे असेही मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे घरगुती उपाय आहेत. त्यांचा वास तीव्र असला तरी या पद्धती खरोखरच प्रभावी आहेत हे सिद्ध करणारे फारसे वैज्ञानिक पुरावे नाहीत. उलट अशा उपायांचा वापर केल्याने कधीकधी कीटक जिथे लपले आहेत तिथून अधिक आत, खोलवर जाऊ शकतात.
प्रभावी, स्वच्छ आणि वैद्यकीयदृष्ट्या योग्य उपाय देखील अनेकदा स्वस्त असतात. जेल बेट्स हा सर्वात प्रभावी, स्वच्छ आणि शाश्वत उपाय मानला जातो. विज्ञानाने देखील याला पाठबळ दिले आहे. या जेलमध्ये फिप्रोनिलसारखे सक्रिय घटक असतात जे केवळ दिसणाऱ्या कीटकांवरच वार करत नाहीत तर त्याही पलीकडे जाऊन त्यांचे काम करतात. इंटरनॅशनल जर्नल ऑफ पेस्ट मॅनेजमेंटमध्ये 2020 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, जेल बेट्स वापरल्यानंतर फक्त दोन आठवड्यांतच कीटकांचा प्रादुर्भाव 95% ने कमी करतात. हे जेल खाल्ल्यानंतर झुरळे त्यांच्या लपलेल्या ठिकाणी जाऊन मरतात, परिणामी त्यांच्या संपर्कात येणारी इतर झुरळे देखील नष्ट होतात. थोडक्यात, झुरळांचा पूर्णपणे नायनाट होतो. हिट अँटी रोच जेल हे असेच एक प्रसिद्ध, DIY कीटक-नियंत्रण जेल फॉर्म्युलेशन आहे, जे सूचनांनुसार वापरल्यास बरेच प्रभावी आहे. प्रामुख्याने कोरड्या, आणि जिथे कीटक लपू शकतात अशा भागात जेलचे लहान थेंब काढले जातात. उपकरणांच्या मागे, सिंकखाली किंवा भेगांमध्ये ते सावधगिरीने लावले जाते.
पारंपरिक पद्धतींमध्ये असलेला धोका बाजूला सारत ते दीर्घकालीन संरक्षण देतात. जेल बेट्सचा प्रभाव सहसा दीर्घकाळ टिकणारा असतो, ज्यामुळे 45 दिवसांपर्यंत तरी घर झुरळांपासून सुरक्षित होते.जर कीटकांचा प्रादुर्भाव जास्त असेल तर एकात्मिक कीटक व्यवस्थापन (IPM) पद्धतीद्वारे व्यावसायिक रितीने कीटक नियंत्रण सेवांची शिफारस केली जाते. जागतिक आरोग्य संघटना आणि भारताच्या केंद्रीय कीटकनाशक मंडळासारख्या संस्थांद्वारे मान्यताप्राप्त, IPM स्वच्छता, पर्यावरणीय बदल आणि जबाबदार कीटकनाशकांचा एकत्र वापर करते. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगत केवळ दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर फवारणी करण्याऐवजी कीटकांच्या काही ठराविक गोष्टी तसेच जीवनचक्रावरच हे प्रहार करतात.
स्प्रेच्या संपर्कात आल्यावर समोर दिसणारी झुरळे नष्ट होतात. त्वरित दिलासा मिळण्यासाठी हे प्रभावी आहे आणि ते नियमित वापरले गेले पाहिजे. डस्टबिन, गॅस सिलेंडरजवळ, स्वयंपाकघरातील सिंक, कॅबिनेट आणि फ्रिजखाली या सामान्यतः झुरळे लपतात अशा जागा आहेत. या ठिकाणी फवारणी करा आणि झुरळांना दूर ठेवा. शेवटी, आपण झुरळांच्या समस्येवर कसा तोडगा काढतो यावरूनच आपल्या घरातील वातावरणाची आपल्याला किती चांगली जण आहे, हे लक्षात येते. असुरक्षित, अवैज्ञानिक पद्धती वापरण्याऐवजी आपल्याला माहितीपूर्ण, प्रभावी धोरणे स्वीकारण्याची आवश्यकता आहे. खरे कीटक नियंत्रण म्हणजे केवळ झुरळांना नष्ट करणे नाही, तर ते योग्यरित्या योग्य कारणांसाठी करणे हे आहे. म्हणून, पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला झुरळ आढळेल तेव्हा जरा थांबा आणि योग्य पर्याय निवड. कारण चुकीच्या पद्धतीने झुरळ मारल्याने तुमच्या घराचे वातावरण अधिकच बिघडेल.