Celebrate Happy Kiss Day 2025
व्हॅलेन्टाईन्स वीकमधील आजचा खास दिवस म्हणजे किस डे. या प्रेमाच्या सप्ताहात या दिवसाला प्रमुख महत्त्व आहे. आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी किस डे साजरा केला जातो. अनेकदा मनातील भावना शब्दातून व्यक्त करता येत नाहीत अशात त्या भावना एका साध्या किस’ने व्यक्त होतात. याद्वारे आपल्या प्रेमाच्या भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहचवल्या जातात. कपल्समध्ये या दिवसाची क्रेझ फार आहे, लोक निरनिराळ्या पद्धतींनी हा दिवस साजरा करू पाहतात. या दिवसानिमित्त तुम्ही तुमच्या जोडीदाराला भेटवस्तू देखील देऊ शकता.
आपल्या मनातल्या भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहचवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. किस डेच्या निमित्ताने तुमच्या पार्टनरसोबत तुमच्या भावना शेअर करण्यात तुम्हाला संकोच वाटत असेल तर भेटवस्तूद्वारे त्यांना सांगा की ते तुमच्यासाठी किती खास आहेत. आज या लेखात आपण किस डे स्पेशल काही हटके गिफ्ट आयडीयाज विषयी जाणून घेणार आहोत.
Kiss Day 2025: किस डे का साजरा करतात? जाणून घ्या रोचक तथ्य!
DIY लव्ह जार
जर तुमचे बजेट खूपच कमी असेल तर तुमच्यासाठी एक DIY लव्ह जार ही एक उत्तम भेट असू शकते. यासाठी तुम्हाला फक्त एक सुंदर जार आणि काही रंगीत लहान कागद आवश्यक असतील. या रंगीत कागदांवर तुम्ही प्रेमळ संदेश, संस्मरणीय क्षणांच्या आठवणी किंवा कोणतेही रोमँटिक वचन लिहू शकता. तुमची मैत्रीण दररोज एक स्लिप वाचेल आणि तुमचे प्रेम अनुभवेल.
कस्टमाइज्ड वॉयस वेव आर्ट
तुम्ही व्हॅलेंटाईन डे वर तुमच्या जोडीदारासाठी बनवलेले कस्टमाइज्ड वॉयस वेव आर्ट देखील बनवून घेऊ शकता. तुमचे प्रेमळ शब्द ऑडिओ वेव्हमध्ये कन्व्हर्ट करून फ्रेम करून घ्या. जेव्हा जेव्हा तुमच्या जोडीदाराला ते दिसेल तेव्हा त्यांना तुमचा आवाज आणि तुमचे प्रेम जाणवेल.
हँडमेड स्क्रॅपबुक
तुमच्या नात्यातील खास आठवणी गोळा करणारे एक स्क्रॅपबुक बनवा किंवा वेगवेगळी प्रेमपत्रे लिहा आणि ती एका बॉक्समध्ये ठेवा. फ्युचर डेट्स, विश लिस्ट आणि खास मेसेज देखील त्यात जोडले जाऊ शकतात. या भेटवस्तूंमध्येही वेगवेगळ्या भावना पाहायला मिळतील.
Hug Day History & Significance 2025: विशेष दिवसाचा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या
एकत्र वेळ घालवा
भेटवस्तू देण्याऐवजी तुम्ही त्यांच्यासोबत एक मोकळा वेळ घालवू शकता. असे करून तुमची तुमच्या आठवणी निर्माण करू शकता. सोबत घालवलेला हा वेळ नेहमीच तुमच्या आठवणीत राहील. यासाठी तुम्ही हॉट एअर बलून राईड, कँडललाइट डिनर, कुकिंग क्लास किंवा वीकेंड ट्रिप अशा गोष्टी करू शकता. यामुळे तुमच्या दोघांमधील बंध आणखी घट्ट होतील आणि तुम्हाला खूप वेळ एकत्र मिळेल.