नॉनव्हेज खाताना चिकन मासे असा एकत्र आहार सुद्धा खातात.चिकन आणि मासे एकत्र खावेत की नाहीत? या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या. असे काही पदार्थ आहेत जे एकत्र खाऊ नयेत. चिकन आणि मासे एकत्र खाणे सुरक्षित आहे का? त्याचे फायदे आणि तोटे काही आहेत का?
निरोगी राहण्यासाठी तुमचा आहार अतिशय पौष्टिक असावा. अनेक वेळा खाण्यापिण्याचे शौकीन लोक अशा काही गोष्टी एकत्र खातात, ज्या आपल्या आरोग्यासाठी त्रासदायक असतात. काही खाद्यपदार्थ असे असतात की ते एकत्र खाल्ल्याने फायद्यापेक्षा तोटाच जास्त असतो. चिकन आणि नॉनव्हेज खाण्याबाबत तुम्ही अनेक गोष्टी ऐकल्या असतील.
नॉनव्हेज शौकीन लोकांचा हाच मोठा प्रश्न आहे, आपण चिकनसोबत मासे खाऊ शकतो का?
असं बघा, मासे आणि चिकन हे दोन्ही उत्कृष्ट मांसाहारी पदार्थ आहेत. दोन्हीमध्ये प्रोटीन्स पुरेशा प्रमाणात आढळतात. शरीर निरोगी ठेवण्यासाठी लोक मासे आणि चिकनचे सेवन करतात. मांसाहार करणारे मासे स्टार्टर म्हणून खातात आणि त्यानंतर चिकन किंवा मटण खातात. मासे आणि चिकन एकत्र खाण्याचा ट्रेंड अनेक ठिकाणी आहे. खरे तर मासे आणि चिकन एकत्र खाणे आरोग्यासाठी नुकसानकारक आहे असच म्हणता येणार नाही.