मंकीपॉक्स हा एक दुर्लभ आजार आहे. हा आजार मंकीपॉक्स व्हायरसमुळे होतो. मंकीपॉक्स हा आजार जनावरांपासून माणसांमध्ये प्रसारित होणाऱ्या व्हायरसमुळे होतो.
मंकीपॉक्स या आजाराची लक्षणे स्मॉलपॉक्ससारखी असतात. या व्हायरसमुळे रुग्णाला ताप, त्वचेवर बारीक दाणे येणे किंवा मोठे सुजल्यासारखे फोड येणे अशा समस्या होऊ शकतात. याव्यतिरिक्त रुग्णांना डोकेदुखी, अंगदुखी, थकवा येणे, घशात सूज येणे, कोरडा खोकला होणे या आरोग्याच्या तक्रारी होऊ शकतात. या व्हायरसचे संक्रमण एकमेकांच्या संपर्कात येण्याने होऊ शकते.
यांपैकी कोणतीही लक्षणे तुम्हाला दिसली तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क करा. तसेच पाळीव किंवा कोणत्याही जनावरांपासून दूर राहा. तसेच तुमच्या शरीरावरील दाणे सुकून त्याजागी नवी त्वचा येईपर्यंत शक्यतो आयसोलेशनमध्ये राहा.
हा व्हायरस रुग्णांच्या कोणत्याही प्रकारच्या संपर्कात येण्याने पसरू शकतो. तसेच गर्भावस्थेत महिलेला हा आजार झाला तर तो बाळालाही होऊ शकतो.
या आजाराला रोखण्यासाठी सध्यातरी विशेष असे वेगळे औषध नाहीय. पण तुम्ही स्वतःची काटेकोरपणे काळजी घेतली तर या आजारातून लवकरात लवकर बरे होऊ शकता.