वाढत्या उष्णतेपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी रोजच्या आहारात करा 'या' फळांच्या रसाचे सेवन
राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे उष्णता वाढली आहे. वाढत्या उष्णतेमुळे आरोग्यासह त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता असते. शरीरात वाढलेली उष्णता आरोग्याला हानी पोहचवते. त्यामुळे दैनंदिन आहारात शरीरात थंडावा निर्माण करणाऱ्या पदार्थांचे जास्त सेवन करावे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे डिहायड्रेशन, थकवा, अशक्तपणा किंवा आरोग्यासंबंधित इतरही समस्या जाणवण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेर गेल्यानंतर पाण्याची बाटली सोबत न्यावी. उन्हाळा वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. या बदलांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. मात्र असे न करता शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रोजच्या आहारात तिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन न करता शरीराला पचन होणाऱ्या हलक्या पदार्थांचे सेवन करावे. याशिवाय आहारात फळे, भाज्या, सरबत, ताक, दही इत्यादी पदार्थांचे जास्त सेवन करण्यास जास्त प्राधान्य द्यावे. आज आम्ही तुम्हाला वाढत्या उष्णतेपासून शरीराचा बचाव करण्यासाठी आहारात कोणत्या फळांच्या रसाचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या फळांच्या रसाचे नियमित सेवन केल्यास शरीराला ऊर्जा मिळेल आणि तुम्ही कायम निरोगी राहाल.
रोजच्या आहारात बीटच्या रसाचे नियमित सेवन करावे. बीटमध्ये असलेले गुणधर्म शरीराला आवश्यक पोषण देतात. याशिवाय शरीराचे कार्य सुधारण्यासाठी मदत होते. बीटचा रस नियमित प्यायल्यास शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता दूर होईल आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डिहायड्रेशनच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी नियमित बीटच्या रसाचे सेवन करावे. या रसाच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि पोट स्वच्छ होते. बीटचा रस बनवण्यासाठी सर्वप्रथम बीट स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात बीटचे तुकडे टाकून आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्सरमधून फिरवून घ्या. त्यानंतर बीटचा रस गाळून सरबताचे सेवन करावे. याशिवाय तुम्ही बीटच्या रसात लिंबाचा रस सुद्धा टाकू शकता.
सर्वच ऋतूंमध्ये काकडी खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. काकडीचे सेवन केल्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. याशिवाय पचनक्रिया सुधारते. काकडीमध्ये ९० टक्के पाणी असते. त्यामुळे उन्हळ्याच्या दिवसांमध्ये काकडीचे सेवन करावे. काकडी शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते. तसेच त्वचेमध्ये जमा झालेले हानिकारक विषाणू बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात काकडीचे नियमित सेवन करावे. काकडीचा रस बनवण्यासाठी सर्वप्रथम, काकडीची साल काढून बारीक तुकडे करून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काकडी आणि गरजेनुसार पाणी घालून मिक्सरमधून फिरवून घ्या. तयार करून घेतलेले रस गाळून त्यात लिंबाचा रस टाकून सेवन करावे. यामुळे शरीर आतून थंड राहील.