• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Low Libido In Men Causes And Symptoms In Marathi

Low Libido In Men: पुरुषांमध्ये शारीरिक संबंधाची इच्छा होतेय कमी, काय आहेत 5 कारणं

सध्या अनेक पुरुषांमध्ये शारीरिक संबंधाची इच्छा कमी होत असल्याचे दिसून येत आहे आणि याची नेमकी कारणं काय आहेत आणि याची लक्षणे काय आहेत याबाबत आपण अधिक माहिती घेऊया

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 03, 2024 | 01:17 PM
का होत नाहीये पुरुषांना शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा

का होत नाहीये पुरुषांना शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजच्या धकाधकीच्या जीवनामुळे आणि शारीरिक समस्यांमुळे पुरुषांमध्ये कामवासनेचा अभाव ही एक सामान्य समस्या बनत चालली आहे. अनेक लोकांचा असा विश्वास आहे की पुरुषांना लैंगिक संबंधात कोणतीही समस्या नसते, परंतु हे चुकीचे आहे. जर तुमच्या पुरुष जोडीदाराला शारीरिक संबंधांमध्ये कमी रस असेल तर यामागे अनेक कारणे असू शकतात.

एक प्रमुख लक्षण म्हणजे पुरूष लैंगिक गोष्टींमध्ये रस दाखवत नाहीत. सर्वसाधारणपणे, पुरुषांना लैंगिक संबंधांबाबत बोलणे आवडते, परंतु जर त्यांना अशा गोष्टींमध्ये रस नसेल तर ते कामवासनेच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. हे लक्षण ओळखल्यानंतर, त्याचे कारण जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे जेणेकरून योग्य उपचार करता येतील. चला जाणून घेऊया पुरुषांमध्ये लैंगिक इच्छा असण्याचे कारण नेमके काय आहे, डॉक्टर माधव भागवत यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे (फोटो सौजन्य – iStock) 

काय आहेत कारणे 

कोणत्या कारणांमुळे कामेच्छा होत नाही

कोणत्या कारणांमुळे कामेच्छा होत नाही

  • मानसिक ताण आणि चिंता: कामाचा दबाव, कौटुंबिक समस्या किंवा वैयक्तिक चिंता यामुळे मानसिक ताण येऊ शकतो, ज्यामुळे जोडीदारासह लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा कमी होऊ शकते
  • हार्मोन्स असंतुलन: टेस्टोस्टेरॉन सारख्या संप्रेरकांची कमी पातळी लैंगिक इच्छा प्रभावित करू शकते. हे वृद्धापकाळ, औषधे किंवा इतर आरोग्य कारणांमुळे असू शकते
  • शारीरिक आरोग्य समस्या: मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग किंवा इतर शारीरिक समस्या देखील लैंगिक इच्छा कमी करू शकतात. या परिस्थितीमुळे रक्त प्रवाह आणि मज्जासंस्थेवर परिणाम होऊ शकतो
  • नातेसंबंधातील समस्या: तणाव, मतभेद किंवा नातेसंबंधातील भावनिक अंतर यांचा लैंगिक इच्छेवर परिणाम होऊ शकतो. हे कोणत्याही जोडप्यामध्ये होऊ शकते. एका ठराविक कालावधीनंतर एखाद्या पुरुषाला शारीरिक संबंध न ठेवण्याची इच्छा होऊ शकते. याचे कारण सतत होणारी भांडणं वा तणावही असू शकते 
  • आळस किंवा थकवा: जास्त शारीरिक किंवा मानसिक थकवा यामुळे शारीरिक संबंधांसाठी उर्जेची कमतरता होऊ शकते, ज्यामुळे इच्छा कमी होऊ शकते आणि त्याचा डायरेक्ट परिणाम शरीरावर होतो 

या कारणांव्यतिरिक्त, काहीवेळा औषधे किंवा इतर जीवनशैली समस्यादेखील लैंगिक इच्छा प्रभावित करू शकतात

RSS च्या मोहन भागवतांचा कुटुंब वाढीचा सल्ला; धडाधड घसरतोय देशातील Fertility Rate, काय आहेत कारणं

काय आहेत लक्षणे 

वेळीच द्या लक्षणांकडे लक्ष

वेळीच द्या लक्षणांकडे लक्ष

  • लैंगिक संभाषणांमध्ये रस नसणे: जर पुरुष लैंगिक संभाषणांमध्ये रस दाखवत नसतील तर त्यांची शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा कमी झाली आहे आणि हे त्यापैकी एक लक्षण असल्याचे समजावे 
  • कमी उत्तेजना: शारीरिक संपर्कादरम्यान उत्तेजना कमी झाल्याची भावना पुरुषांमध्ये दिसून येणे. कधी कधी शारीरिक संबंध ठेवताना अजिबातच उत्तेजना दिसते. केवळ जोडीदारासाठी संबंध ठेवले जातात, ज्यामुळे नात्यातही तणाव होऊ शकतो 
  • शारीरिक थकवा: सततच्या थकव्यामुळे किंवा मानसिक तणावामुळे शारीरिक संबंधांमध्ये रस कमी होतो आणि हे लक्षण सहज लक्षात येण्यासारखे आहे 
  • भावनिक अंतर: जोडीदाराशी भावनिक संबंध नसणे, ज्यामुळे शारीरिक संबंधांवरही परिणाम होतो. घरात सतत वाद असणे अथवा जोडीदाराशी न पटणे यामुळेही ही समस्या निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे एकमेकांसह लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा मनात उद्भवत नाही 
  • झोपेच्या समस्या: कमी झोप किंवा निद्रानाश यामुळे शारीरिक संबंधांमध्ये रस कमी होतो. बरेचदा सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात झोप पूर्ण न होण्याची समस्या अधिक असलेली दिसून येते आणि याचा परिणाम पुरुषांच्या कामेच्छेवरही होतो 

पुरुषांमध्ये कशी वाढेल कामेच्छा 

पुरुषांमध्ये कामवासना वाढवण्यासाठी त्यांना आधी त्याचे कारण जाणून घेणे आवश्यक आहे. यानंतर आवश्यक उपाय करून पहा. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीची कामवासना कमी झाल्यामुळे तणावाची पातळी वाढली असेल, तर त्यांनी तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गरज भासल्यास यासाठी मानसिक आरोग्य तज्ज्ञांना भेटू शकता. तसेच हार्मोनल बदलांमुळे असे होत असेल तर त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधून हार्मोनल थेरपी घ्यावी. याशिवाय आपल्या जोडीदाराशी त्यांनी याबाबत चर्चा करावी. तणाव कमी करून अधिकाधिक आपल्या जोडीदारासह वेळ घालविण्यास प्राधान्य द्यावे 

पुरुषांमध्ये इस्ट्रोजन वाढीमुळे 2 अवयव होतात थुलथुलीत, 5 लक्षणांकडे कराल दुर्लक्ष तर ठरेल धोकादायक!

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Low libido in men causes and symptoms in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2024 | 01:17 PM

Topics:  

  • Health News
  • male infertility

संबंधित बातम्या

Khan Sir दान करणार मेंदू? असं करता येतं का? स्वतःच केला खुलासा, Video Viral
1

Khan Sir दान करणार मेंदू? असं करता येतं का? स्वतःच केला खुलासा, Video Viral

कुटुंबाला ठेवा सुरक्षित! जगभरात वाढतोय न्युमोकॉक्कल आजार, आरोग्यतज्ज्ञांनी दिला इशारा
2

कुटुंबाला ठेवा सुरक्षित! जगभरात वाढतोय न्युमोकॉक्कल आजार, आरोग्यतज्ज्ञांनी दिला इशारा

Brush केल्या-केल्या चहा पिताय? मग जरा थांबाच! अजिबात करू नका ‘ही’ चूक होईल, मोठे नुकसान
3

Brush केल्या-केल्या चहा पिताय? मग जरा थांबाच! अजिबात करू नका ‘ही’ चूक होईल, मोठे नुकसान

Bladder Stone Removal: सतत टपकतेय लघवी, धार मात्र कमकुवत; म्हणजेच ब्लॅडरमध्ये अडकलाय कचरा, ‘असा’ करा स्वच्छ
4

Bladder Stone Removal: सतत टपकतेय लघवी, धार मात्र कमकुवत; म्हणजेच ब्लॅडरमध्ये अडकलाय कचरा, ‘असा’ करा स्वच्छ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
PoK मध्ये पाकिस्तानची ‘गजब बेईज्जती’, 10-10 रूपयात सैनिकांच्या पोषाखाची-हेल्मटची विक्री, Video Viral

PoK मध्ये पाकिस्तानची ‘गजब बेईज्जती’, 10-10 रूपयात सैनिकांच्या पोषाखाची-हेल्मटची विक्री, Video Viral

‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ रेड कार्पेटवर दिसला मराठी कलाकारांचा ग्लॅमरचा जलवा!

‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ रेड कार्पेटवर दिसला मराठी कलाकारांचा ग्लॅमरचा जलवा!

Prakash Ambedkar : पावसानं अतोनात नुकसान! शेतकऱ्यांसाठी प्रकाश आंबेडकरांची मोठी मागणी

Prakash Ambedkar : पावसानं अतोनात नुकसान! शेतकऱ्यांसाठी प्रकाश आंबेडकरांची मोठी मागणी

Stocks to Watch Today: हिरो मोटोकॉर्पपासून मारुती आणि टाटा पॉवरपर्यंत, आज हे स्टॉक्स आहेत गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम

Stocks to Watch Today: हिरो मोटोकॉर्पपासून मारुती आणि टाटा पॉवरपर्यंत, आज हे स्टॉक्स आहेत गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम

Photo : KL Rahul ने झळकावले 11 वे कसोटी शतक, नऊ वर्षांनंतर घरच्या मैदानावर पहिलेच शतक

Photo : KL Rahul ने झळकावले 11 वे कसोटी शतक, नऊ वर्षांनंतर घरच्या मैदानावर पहिलेच शतक

सून बनली कैदाशीण…! हात पिरगळला, केस ओढले अन् हातातल्या ग्लासाने केली मारहाण; सासूच्या मारहाणीच्या Video Viral

सून बनली कैदाशीण…! हात पिरगळला, केस ओढले अन् हातातल्या ग्लासाने केली मारहाण; सासूच्या मारहाणीच्या Video Viral

Snapchat ने युजर्सना दिला धोका! फ्रीमध्ये नाही दिसणार यूजर्सचं फेव्हरेट फीचर, जुने फोटो – व्हिडीओ पाहण्यासाठी द्यावे लागणार पैसे

Snapchat ने युजर्सना दिला धोका! फ्रीमध्ये नाही दिसणार यूजर्सचं फेव्हरेट फीचर, जुने फोटो – व्हिडीओ पाहण्यासाठी द्यावे लागणार पैसे

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.