उन्हाळ्यात लहान मुलांसाठी १० मिनिटांमध्ये बनवा गव्हाच्या पिठाची चविष्ट पेज
उन्हाळा वाढल्यानंतर लहान मुलांच्या नाश्त्यात बदल करून पचनास हलक्याअसलेल्या पदार्थांचे सेवन करण्यास मुलांना द्याव. यामुळे मुलांची पचनक्रिया बिघडत नाही. याशिवाय शरीराला अनेक फायदे होतात. सकाळच्या नाश्त्यात नेहमीच कोणत्या पदार्थांचे सेवन करावे? असे अनेक प्रश्न पालकांना पडतात. अशावेळी काही घरांमध्ये मुलांना बाहेरून विकत आणलेले तेलकट किंवा तिखट पदार्थ खाण्यास दिले जातात. मात्र नेहमी नेहमी तेलकट पदार्थ खाऊन लहान मुलांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांना नाश्त्यात किंवा इतर वेळी सात्विक आणि पचनास हलके असलेले पदार्थ खाण्यास द्यावे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये गव्हाच्या पिठाची पेज बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. याआधी तुम्ही तांदळाची पेज किंवा इतर धान्यांपासून बनवलेली पेज खाल्ली असेल मात्र आज आम्ही तुम्हाला गव्हाच्या पिठाची पेज बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
रात्रीच्या उरलेल्या डाळीपासून सकाळी बनवा टेस्टी पराठा; चव चाखून सर्वच होतील खुश