२ मिनटात बनवा फेसाळलेली काॅफी, महागडी माशीची गरज लागणार नाही; काय आहे पद्धत? (फोटो सौजन्य - istock)
आपण कॅफेमध्ये गेलो की काही टेस्टी खायला घेतो आणि सोबत कॉफी घेतो. आधी कॉफी म्हणजे फक्त कॉफी असायची. म्हणजे दुधात कॉफी टाकली आणि साखर टाकलं बस झालं. आता तस नाही आहे. कारण त्यात अनेक फ्लेवर्स आले आहेत. फेसाळलेली कोल्ड किंवा हॉट कॉफी, वनेला कॉफी, चोकोलेटे कॉफी, हेझलनत कॉफी अश्या भरपूर प्रकारचे कॉफी मार्केट मध्ये उपलब्ध आहे. कोल्ड किंवा हॉट कॉफी हे सगळ्यांनाच आवडतात. मात्र आपल्याला घरी बनवतात येत नाही. म्हणून आपण कॉफी प्याला कॅफे मध्ये जातो. ती कॉफी प्रत्येक मार्केट मध्ये वेगवेगळ्या रेटची असते. कुठे महाग तर कुठे स्वस्थ. परंतु भरपूर ठिकाणी ही कॉफी महाग असते. आणि रोज जर प्याची असेल तर पैसे खर्च होतात. पण जर मी म्हणट्ल की आपण घरी फेसाळलेली काॅफी बनवू शकतो तर. हो, बरोबर वाचलात आपण ही कॉफी घरी बनवू शकतो. चला बघुयात काय आहे प्रक्रिया.
Chocolate Idli Recipe: लहान मुलं होतील खुश, अवघ्या 10 मिनिटांतच घरी बनवा चॉकलेट इडली
कॅफे सारखी स्वादिष्ट कॅपेचीनो (Cappuccino) तुम्हाला घरी बनवायच आहे पण महागळी काॅफी मशीन नाही आहे तर काळजी करु नका. आपण मशीनने नाही तर एका बाॅटलने बनवनार आहोत आणि तेही खुप सोप्या पध्तीने. कैफे मध्ये मिळणारी काॅफी खुप महाग असते आणि रोज जर विकत घेतली तर पैसे खर्च होतात. म्हणूनच एक अशी ट्रेक आहे ज्या पैसे जास्त लागणार नाही आणि खूप बनववण्याची पद्धत खूप सोपी आहे. मशीन नसल्यावर दोन मिनटात कशी कॉफी बनवायची बघुयात.
एक कप कॉफी करिता लागणारी सामग्री
२ टेबलस्पून इंस्टेंट कॉफी
३ टेबलस्पून साखर
४ टेबलस्पून पाणी
१ कप गरम दूध
कशी बनवायची फेसाळलेली कॅपेचीनो?
१. एक साफ प्लास्टिक आणि काचेची बॉटल घ्या आणि त्यात इंस्टेंट कॉफी,साखर आणि पाणी टाका.
२. बाटलीचे झाकण घट्ट बंद करा आणि २ मिनिटे जोरात हलवा
३. काही वेळातच हे मिश्रण हलके आणि फेसयुक्त होईल.
४. आता एका कपमध्ये गरम दूध किंवा थंड दूध घाला आणि त्यावर तयार केलेले फेसाळलेले मिश्रण ओता.
५. ते हलके मिसळा आणि वर थोडी कॉफी पावडर शिंपडा.
या सोप्या पद्धतीने तुम्ही महागड्या मशीनशिवाय फेसाळलेली कॅपेचीनो तयार करू शकता आणि आनंद घेऊ शकता. ही पद्धत खुप सोपी आहे. आता कैपेचीनो प्यायला कॅफेमध्ये जायची गरज नाही आहे. तुम्ही घरीच कैपेचीनो बनवू शकता आणि स्वादिष्ट कॉफीचा आनंद घेऊ शकता.
सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये पोटॅटो चीज बॉल्स,लहान मुलांसह मोठ्यांना आवडेल पदार्थ