सकाळी लवकर उठल्याने होतात अनेक फायदे
धावपळीच्या जीवनात योगा आवश्यक
आळस यायला अनेक कारणे ठरतात कारणीभूत
Lifestyle News: हल्ली आपले जीवन अत्यंत धावपळीचे झाले आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपली धावपळ सुरूच असते. त्यामुळे कधीकधी आपल्याला थकवा जाणवतो. धावपळीच्या जीवनात आपले आहाराकडे, व्यायामाकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे शरीरावर परिणाम होण्याची शक्यता असते. दरम्यान दिवसभर शरीरात ऊर्जा राहण्यासाठी काय केले पाहिजे ते जाणून घेऊयात.
कधी कधी आपल्या दिवसाची सुरुवात आळसावलेली होते. त्याला अनेक कारणे असतात. मात्र तसे झाल्यास आपल्याला दिवसभर आळस जाणवतो. मात्र पाच गोष्टी तुम्ही सकाळी उठल्यावर केल्या तर दिवसभर तुम्हाला एकदम प्रफुल्लित वाटेल. तर त्याच पाच सवयी कोणत्या आहेत, त्या जाणून घेऊयात.
सकाळी लवकर उठावे
जर का तुम्हाला एक आरोग्यदायी आयुष्य हवे असेल आणि तुम्हाला निरोगी आयुष्य हवे असेल तर तुम्ही सकाळी लवकर उठण्याची सवय लावली पाहिजे. सकाळी लवकर उठून चालायला जाणे, व्यायाम करणे असे तुम्ही करू शकता. सकाळचे कोवळे ऊन तुम्ही घेऊ शकता.
सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यावे
रोज सकाळी उठल्यावर तुम्ही कोमट पाण्याचे सेवन करू शकता. कोमट पाणी पिणे शरीरासाठी फायदेशीर असते. कोमट पाण्याचे सेवन केल्याने मेटोबॉलिजम चांगले होते. ज्यामुळे पचन संस्था मजबूत होते. कोमट पाण्यात तुम्ही लिंबू देखील पिळू शकता.
योगा व मेडिटेशन
तुम्ही दिवसाची सुरुवात मेडिटेशन आणि योगा करून देखील करू शकता. यामुळे मन आणि डोके शांत राहण्यास मदत होते. प्रसन्नता निर्माण होते. मेडिटेशन आणि योगा केल्याने तणाव कमी होतो. तसेच पूर्ण दिवसभर शरीरात ऊर्जा कायम राहण्यास मदत होते.
Lifestyle News: 1 महिना गोड पदार्थ न खाल्ल्यास शरीरात होतील ‘हे’ अद्भुत बदल; दीर्घ आजार होतील छुमंतर
सकस आहार
सकाळी उठल्यावर कायम हेल्दी नाश्ता करावा. त्यामुळे तुम्हाला पूर्ण दिवसभर ऊर्जा कायम राहते. तुम्ही नाष्ट्यामध्ये प्रोटीन, फायबर, हेल्दी फॅट्स असणारे पदार्थांचे सेवन करू शकता. यामुळे पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते.
दिवसाचे योग्य नियोजन
सकाळी उठल्यापासून आपल्या धावपळ करावी लागते. रात्री झोपेपर्यंत आपल्याला धावपळ करावी लागते. ताण कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या दिवसाचे योग्य नियोजन करू शकता. त्यामुळे तुम्हाला जास्त ताण घ्यावा लागणार नाही.