सांध्यांमधील लवचिकता वाढवण्यासाठी मधात मिक्स करा 'या' फळाची पावडर
पूर्वीच्या काळापासून आत्तापर्यंत जायफळाचा वापर औषधी गुणधर्म म्हणून केला जात आहे. गोड पदार्थ किंवा इतर कोणतेही पदार्थ बनवण्यासाठी जायफळाच्या पावडरचा वापर केला जातं आहे. जायफळ आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. जायफळमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे झोपेची मदत होते आणि मानसिक तणाव कमी होतो. शरीरात वाढलेला अशक्तपणा कमी करण्यासाठी जायफळाचे सेवन करावे. शरीराची कमी सुधारण्यासाठी दुधात जायफळ मिक्स करून प्यावे. मानसिक आणि शारीरिक तणाव, बिघडलेली पचनक्रिया, झोपेसंबंधि समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी मध आणि जायफळाचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला मध आणि जायफळचे एकत्र सेवन केल्यामुळे आरोग्याला नेमके होतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
मूळव्याधासाठी प्रभावी ठरतील स्वयंपाक घरातील ‘हे’ शक्तिशाली पदार्थ, पोटातील घाण होईल स्वच्छ
अनेकांना मानसिक किंवा शारीरिक तणावामुळे झोप येत नाही. रात्रीच्या वेळी काहींना कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा झोप लागत नाही. अशावेळी जायफळाचे सेवन करावे. एक ग्लास दुधात चिमूटभर जायफळ पावडर टाकून मिक्स करा. या दुधाचे नियमित सेवन केल्यास रात्रीच्या वेळी चांगली झोप लागेल आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. याशिवाय तुम्ही एक चमचा मधात चिमूटभर जायफळ पावडर मिक्स करून चाटण बनवून खाऊ शकता. यामुळे नैसर्गिक संयुग मेंदूवरील ताण कमी करतील आणि झोप चांगली लागेल.
बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी मध आणि जायफळ पावडर मिक्स करून खावे. यामुळे आतड्यांमधील घाण होईल. गॅस, ऍसिडिटी, अपचन, पोटदुखी इत्यादी समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी जायफळ मधात मिक्स करून प्यावे. जायफळमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. शरीरात होणारी जळजळ कमी करण्यासाठी मध आणि जायफळचे सेवन करावे.
साथीचे आजार किंवा इतर काही कारणांमुळे शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी मध आणि जायफळचे सेवन करावे. जायफळमध्ये अँटीऑक्सिडंट्स, मॅग्नेशियम आणि झिंक इत्यादी अनेक घटक आढळून येतात. या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात साचून घटक जातात आणि पोट स्वच्छ होते. थंडीच्या दिवसांमध्ये या मिश्रणाचे सेवन केल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
दुपारच्या जेवणात चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, पोटासंबंधित समस्यांमध्ये होईल वाढ
शारीरिक आणि मानसिक तणाव आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. शरीरात तणाव वाढल्यामुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. याशिवाय मेंदूवरील ताण वाढत जातो. मेंदूवर वाढलेला ताण कमी करण्यासाठी मध आणि जायफळच्या मिश्रणाचे सेवन करावे. जायफळचे सेवन केल्यामुळे मेंदूच्या न्यूरोट्रांसमीटरवर सकारात्मक परिणाम दिसून येतो.