ईशा अंबानीचा मेट गाला लुक (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
ईशा अंबानी नेहमीच आपल्या क्लासी लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेत आणि मेट गालामध्ये तर ती कोणता लुक करणार याकडे सर्वांचे लक्ष असते. यावेळी २०२५ च्या मेट गालामध्ये ईशा अंबानीने भारतीय डिझायनर अनामिका खन्ना यांनी बनवलेल्या कस्टम कॉउचर पोशाखात आकर्षक उपस्थिती लावली, हा ड्रेस आणि ईशाचा लुक खूपच रॉयल आणि क्लासी दिसून येत आहे. यावेळी ईशाच्या ड्रेसचे डिकोडिंग करणे म्हणजे अगदी युनिकनेस हा शब्द परफेक्ट शोभून दिसेल.
ईशा अंबानी कधीही आपल्या लुकमध्ये कोणतीही कसर सोडत नाही आणि यावेळीही तिने आपण किती क्लासी आहोत हे दाखवून दिले आहे. कसा आहे ईशाचा Met Gala मधील लुक आपण पाहूया (फोटो सौजन्य – Instagram @anaitashroffadajania)
ईशाचा क्लासी लुक कसा झाला तयार?
ईशाचा क्लासी आणि मेट गाला लुक
Isha Ambani चा लुक तयार करण्यासाठी २०,००० पेक्षा जास्त तास लागले. या पोशाखात मोती आणि सोनेरी धाग्याचे काम असलेला पांढरा भरतकाम केलेला कॉर्सेट, काळी टेलर केलेली ट्राउझर्स आणि हाताने विणलेल्या बनारसी ट्रेन आणि गुंतागुंतीच्या जरदोझी भरतकामासह संरचित पांढरा फ्लोअर-लेंथ केप होता, ज्यामध्ये तीक्ष्ण पाश्चात्य टेलरिंग आणि समृद्ध भारतीय कारागिरीचे मिश्रण होते.
डिझाइनमध्ये काळ्या डँडी शैलीने प्रेरित घटकांचा सूक्ष्मपणे समावेश करण्यात आला होता, जो गालाच्या थीम “सुपरफाईन: टेलरिंग ब्लॅक स्टाईल” आणि ड्रेस कोड “टेलर्ड फॉर यू” शी जुळला होता.
ईशाचे डायमंडचे दागिने
ईशाचे नेत्रदीपक हिऱ्याचे दागिने
ईशाने तिच्या वैयक्तिक संग्रहातील एक विंटेज कार्टियर डायमंड नेकलेस घातला होता, जो नवानगरच्या महाराजाचा असल्याचे मानले जाते, ज्यामध्ये ४८० कॅरेटपेक्षा जास्त ८९ दगड होते, ज्यामध्ये एक प्रमुख ८०.७३-कॅरेट कुशन-कट हिरा होता. तिने हा नेकलेस आपल्या आईचा असल्याचे एका मुलाखतीदरम्यान सांगितले.
ड्रेसचा रॉयलनेस
ईशाच्या ड्रेसचे डिकोडिंग
ईशाने तिच्या केपवर हिऱ्याची बटणे, हिऱ्याने जडवलेले कंबरेचे दागिने, मोत्यांनी जडलेले पक्षी केसांचे पिन, टिफनी अँड कंपनीच्या पक्ष्यांच्या अंगठ्या आणि मोराच्या आकाराची केसांची क्लिप देखील घातली होती, हे सर्व भारतीय राजेशाही आणि वारशाला शोभून दिसणारे आहे. एखाद्या राजकुमारीपेक्षा कमी ईशा दिसत नव्हती. कोणत्याही राजघराण्याच्या कार्यक्रमात शोभून दिसेल असाच ईशाचा लुक दिसून आला
मेकअप
रॉयल मेकअप
ईशा अंबानीने अत्यंत ग्लॉसी मात्र उठावदार असा मेकअप केल्याचे यावेळी दिसून आले. रॉयल ड्रेससह मेकअपही रॉयल दिसणाराच होता. ईशाने आपल्या ड्रेसनुसार नेलआर्ट करून घेतले आहे. तर याशिवाय तिने फाऊंडेशन, कन्सीलर आणि चेहऱ्यावर हायलायटरचा पुरेपूर वापर करून घेत ग्लॉसी मेकअप केलाय. याशिवाय तिने डार्क आयशॅडो, लायनर, मस्कारा आणि डार्क काजळ डोळ्यांना लावत आपल्या लुकला अधिक उठाव दिलाय. ओठांना ग्लॉसी लिपस्टिकसह लुक अपलिफ्ट केलाय.
इशा अंबानी ठरली ‘आयकॉन ऑफ द इयर अवॉर्ड’ची मानकरी! स्टाईल स्टेटमेंटने जिंकली सर्वांची मनं
हेअरस्टाईल
ईशा अंबानीची क्लासी हेअरस्टाईल
ईशाने यावेळी एक वेगळीच हेअरस्टाईल करत वेणी घातली आहे. मात्र ही वेणी नेहमीसारखी नसून सागरवेणीसारखी आहे आणि ही स्टाईल तिच्या स्टाईल स्टेटमेंटसाठी परपेक्ट दिसून येत आहे. तिने केस अगदी चापूनचोपून बसवले असून तिचा हा लुक चाहत्यांच्या हृदयावर थेट वार करतोय. तर संपूर्ण लुककडे पाहून श्रीमंती आणि स्टाईल असावी तर अशी हा विचार मनात आल्याशिवाय नक्कीच राहणार नाही.