(फोटो सौजन्य: istock)
बदलत्या वातावरणानुसार, रोगांचे प्रमाणही वाढले आहे. आजकाल प्रत्येक व्यक्तीला आरोग्यविषयक कोणती ना कोणती समस्या जाणवते. मग ते हाडांचे दुखणे असो, त्वचेच्या समस्या असो वा आरोग्याच्या समस्या. आरोग्याच्या या समस्या फक्त औषधांनीच नव्हे तर काही पारंपरिक पद्धतींनीही दूर करता येतात. आपल्या शरीराच्या आणि आरोग्याच्या स्वछतेसाठी स्नान ही एकमेव प्रभावी पद्धत आहे. नियमित आंघोळ केल्याने फक्त शरीराची स्वछताच राखली जात नाही तर याचा मानसिक आणि शारीरिक आरोगयावरही सकारात्मक परिणाम होतो.
शरीराची दुर्गंधी दूर करण्यासाठी अनेक केमिकलयुक्त पदार्थांचा वापर केला जातो जसे की, डिओड्रंट्स मात्र यातील केमिकलयुक्त घटक आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरतात अशात यावर एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय म्हणजे तुरटी! बाजारात सहज विकत मिळणाऱ्या या तुरटीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात, जे शरीरातील जिवाणू आणि घामाच्या वासास कारणीभूत असलेल्या घटकांना नष्ट करतात. एवढेच काय तर यामुळे त्वचेच्या आणि आरोग्याच्या समस्याही दूर होतात. तुम्ही रोज सकाळी आंघोळ करताना पाण्यात तुरटीचा खडा टाकू शकता.
Heart Attack Signs: छातीत जळजळ पासून अस्वस्थतेपर्यंत, हृदयाच्या ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका
घामाच्या वसापासून मिळते सुटका
तुरटीमध्ये नैसर्गिकरित्या अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे घामाच्या दुर्गंधीला दूर करण्यास मदत करतात. यातील घटक घामातून येणाऱ्या जीवाणूंना मारून टाकण्यास मदत करतात ज्यामुळे घाण वास नष्ट होतो. जर तुम्हाला सतत घाम येत असेल आणि अंडरआर्म्समध्ये दुर्गंधी राहत असेल तर आंघोळीच्या वेळी पाण्यात तुरटीचा एक खडा टाका. यामुळे शरीर स्वछ होते आणि सर्व बॅक्टेरिया नष्ट होतात.
त्वचेचा संसर्ग होतो दूर
तुरटी हा एक नैसर्गिक घटक असून तो एका अँटीसेप्टिकप्रमाणे काम करतो. याचा वापर शरीरावरील लहान-मोठे बॅक्टेरिया आणि फंगल संसर्ग दूर करण्यास मदतनीस ठरतो. जर तुम्हाला वारंवार चामखीळ (Warts), त्वचेवर पुरळ, खाज किंवा संसर्ग होण्याची तक्रार असेल तर तुरटीच्या पाण्याने आंघोळ करणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. यामुळे शरीर ताजेतवाने होते.
तूप-त्रिफळा-आवळा… डॉक्टरांनी सांगितले मोतीबिंदूवर घरगुती उपाय; दीर्घकाळ टिकून राहील दृष्टी
सांधेदुखीपासून मिळतो आराम
तुरटीचा वापर सांधेदुखीपासून अराम मिळवून देण्यासही उपयुक्त मानला जातो. यामुळे केसांचे आरोग्यही सुधारते. तुरटीच्या पाण्याने केस धुतल्यास केस मजबूत, चमकदार आणि सुंदर होतात. तसेच जर तुमच्या शरीरावर कोणत्या जखमा असतील तर तुरटीचे पाणी या जखमा भरून काढण्यास मदत करते आणि संसर्गाचा धोका टाळते.