(फोटो सौजन्य: istock)
सिगारेटची सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरते हे तर सर्वांनाच ठाऊक आहे मात्र याचे आरोग्यावर नक्की कोणकोणते परिणाम होत असतात तुम्हाला माहिती आहे का? तुम्हालाही दिवसातून दोन-तीन वेळा सिगारेट ओढण्याची सवय असेल, तर तुम्ही ही बातमी पूर्णपणे वाचा, कारण नुकतीच एक स्टडी समोर आहे ज्यात सिगारेट संबंधित अनेक धक्कादायक बाबी उघड करण्यात आल्या. सिगारेटची ही सवय आपले रोजचे आयुष्य हळूहळू कमी करत असते. आता तुम्ही म्हणाल यात नवीन काय आहे, सिगारेट ओढणे जीवघेणे ठरते हे सर्वांनाच माहीत आहे. पण जर्नल ऑफ ॲडिक्शनमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात एक नवीन गोष्ट समोर आली आहे.
अलीकडेच, युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनच्या एका संशोधनात असे दिसून आले आहे की दिवसातून एक सिगारेट ओढल्याने तुमचे सरासरी आयुर्मान 20 मिनिटांनी कमी होते. एक सिगारेट पुरुषांचे आयुर्मान सरासरी 17 मिनिटांनी आणि महिलांचे आयुर्मान 22 मिनिटांनी कमी करते. अशात तुम्ही जर अधिक काळापासून सिगारेट ओढत असाल तर आतापर्यंत तुम्ही तुमचे किती वय कमी केले याचा अंदाज लावा.
याआधीही सिगारेटवर अनेक अभ्यास करण्यात आले आहेत, परंतु त्यात असा डेटा समोर आलेला नाही. हे आकडे मागील अंदाजापेक्षा खूप जास्त आहेत. पूर्वीच्या अभ्यासातून असे दिसून आले होते की एक सिगारेट ओढल्याने आयुष्य 11 मिनिटांनी कमी होते, परंतु आता असे आढळून आले आहे की आयुर्मान सुमारे 20 मिनिटांनी कमी होते. याचा अर्थ असा की जर कोणी 20 सिगारेटचे पॅकेट ओढले तर त्याचे आयुष्य सुमारे 7 तासांनी कमी होऊ शकते. या संशोधनानंतर खुद्द शास्त्रज्ञांनाही धक्का बसला आहे.
यूसीएलच्या संशोधकांचे म्हणणे आहे की, जे लोक धूम्रपान करतात त्यांनी ही वाईट सवय सोडून नवीन वर्षाची सुरुवात करावी. जितक्या लवकर एखादी व्यक्ती धूम्रपान सोडते तितक्या लवकर त्याला त्याचे फायदे मिळतात. यामुळे तो दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगू शकतो. मात्र, संशोधकांनी असेही म्हटले आहे की, धूम्रपान सोडण्याचे फायदे तेव्हाच मिळतील जेव्हा ती व्यक्ती पूर्णपणे धूम्रपान सोडेल. तुम्ही जरी दिवसातून एक सिगारेट ओढत असाल तरी त्याचे तुमच्या आरोग्यावर याचे गंभीर परिणाम होतील.
सिगारेटमुळे व्यक्तीचा मृत्यू त्याच्या जवळ येतो आणि आयुष्य हळूहळू कमी होऊ लागते. हा मृत्यू येण्याआधी त्याला अनेक आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. ज्यात खाली दिलेल्या काही आरोग्य समस्यांचा समावेश आहे.
Heart Attack Signs: छातीत जळजळ पासून अस्वस्थतेपर्यंत, हृदयाच्या ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका
यावर काय आहे उपाय?
तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवून या धोक्याला तुमच्यापासून दूर करू शकता. जेव्हा तुम्हाला सिगारेट ओढावीशी वाटेल तेव्हा स्वतःचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करा. यासाठी तुम्ही संगीत ऐकणे, फिरायला जाणे, चित्रपट पाहणे, कुटुंबासोबत वेळ घालवणे किंवा तुमच्या आवडीचे काम करणे अशा काही मार्गांनी सिगारेटची तलप कमी करू शकता. हे तुम्हाला धूम्रपानाबद्दल विचार करण्यापासून प्रतिबंधित करेल.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.