(फोटो सौजन्य: istock, Youtube)
अलीकडेच इंस्टाग्रामवर हळद आणि पाण्याचा ट्रेंड फार चर्चेत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच लोक या ट्रेंडची मजा लुटत आहेत. यात लोक मोबाईलची फ्लॅश लाईट ऑन करून त्यावर आपला स्मार्टफोन ठेवतात आणि मग त्यावर पाण्याचा भरलेला ग्लास ठेवला जातो. या पाण्याने भरलेल्या ग्लासात हळूहळू हळद टाकली जाते, त्यानंतर एक सुंदर दृश्य दिसू लागते. हा ट्रेंड सुंदर तर आहेच मात्र तुम्हाला माहिती आहे का? यात वापरण्यात आलेली हळद अनेक वर्षांपासून एक औषध म्हणून वापरली जाते.
संसर्गजन्य आजारांपासून दूर राहण्यासाठी मधात मिक्स करून खा ‘हा’ पदार्थ, कायमच शरीर राहील निरोगी
एका संशोधनानुसार हळदीचा वापर आग्नेय आशियामध्ये केवळ अन्नात मसाला म्हणूनच नाही तर धार्मिक विधींमध्ये देखील केला जातो. आपल्या औषधी गुणधर्मांमुळे फार जुन्या काळापासू हळदीचा वापर वेगवेगळे आजार दूर करण्यासाठी केला जातो. गेल्या 25 वर्षांत, हळदीवर 3000 हून अधिक वैज्ञानिक संशोधन प्रकाशित झाले आहेत. आयुर्वेद आणि युनानी वैद्यकीय ग्रंथांमध्ये हळदीचे औषधी गुणधर्म वर्णन केले आहेत. संस्कृतमध्ये हळदीची 52 नावे वर्णन केली आहेत. हळद हा एक सोनेरी रंगाचा मसाला आहे जो कुरकुमा लोंगा वनस्पतीच्या मुळापासून मिळतो. हळदीपासून तुमच्या आरोग्याला अनेक फायदे मिळत असतात. चला हे कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊया.
संशोधनानुसार, हळदीचा मुख्य सक्रिय घटक कर्क्यूमिन आहे, जो त्याच्या अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्मांसाठी ओळखला जातो. परंतु कर्क्यूमिन केवळ शरीरात योग्यरित्या पचत नाही. शास्त्रज्ञांनी असे म्हटले आहे की जर तुम्हाला हळदीचे जास्तीत जास्त फायदे हवे असतील तर तुम्ही काळी मिरी (ज्यामध्ये पाइपरिन असते) किंवा चरबी (जसे की तूप, तेल) सोबत हळद घ्यावी. असे केल्याने, तुमच्या शरीरात हळदीचे शोषण २०००% पर्यंत वाढू शकते. शरीरासाठी कर्क्यूमिनचे काय फायदे आहेत जाणून घेऊया.
जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास उपयुक्त
हळदीमध्ये कर्क्यूमिन घटक असते जे जळजळ आणि पेशींना नुकसान पोहोचवणारा ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करते. यामुळे अनेक आजारांचे धोकाही टळतो. १९ अभ्यासांच्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की ते शरीरातील जळजळ होण्याचे निर्देशक, जसे की CRP, किंचित कमी करू शकते.
सांधेदुखी आणि संधिवात पासून आराम
अनेक क्लिनिकल चाचण्यांमध्ये असे आढळून आले आहे की कर्क्युमिन सांधेदुखीपासून आराम देण्यासही मदत करतो. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की हळदीचे पूरक पदार्थ आयबुप्रोफेन सारख्या औषधांइतकेच प्रभावी होते परंतु त्यांचे दुष्परिणाम कमी होते.
हृदय निरोगी ठेवण्यास उपयुक्त
कर्क्युमिन रक्तवाहिन्यांच्या कार्यप्रणालीत सुधारणा करते, कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब कमी करते. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की कर्क्युमिनमुळे हार्ट ऑपरेशन करणाऱ्या रुग्णांमध्ये हृदयविकाराचा धोका 65% कमी होतो. हे जळजळ आणि तणावामुळे होणाऱ्या नुकसानांपासून हृदयाचे संरक्षण करते.
मधुमेह आणि चयापचय नियंत्रण
कर्क्यूमिन इन्सुलिनला चांगले काम करण्यास मदत करते, रक्तातील साखर नियंत्रित करते आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करते. नॅनो-कर्क्यूमिन सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेल्या पूरक पदार्थांमध्ये हा परिणाम आणखी चांगला असल्याचे दिसून आले आहे.
मेंदू आणि पचन सुधारण्यास उपयुक्त
कर्क्यूमिनचा मेंदूवर देखील सकारात्मक परिणाम होत असतो. यामुळे स्मरणशक्ती सुधारते, मूड सुधारतो आणि मानसिक थकवा कमी होतो. याशिवाय, यामुळे पित्ताचा त्रास कमी होतो, पचन सुधारते आणि सतत पोटात होणारी जळजळ कमी होते.
धुतलेले केस ओले असताना चुकूनही करू नका ‘या’ चुका, अन्यथा केस होतील झाडू सारखे खराब आणि कोरडे
कर्करोग आणि केमोथेरपीमध्ये उपयुक्त
एका प्राथमिक अभ्यासात असे आढळून आले आहे की, कर्क्युमिन कर्करोगाच्या पेशींची वाढ मंदावते ज्यामुळे केमोथेरपी सुधारते. याशिवाय हळद घेतल्याने सोरायसिस आणि तोंडाच्या अल्सरसारख्या त्वचेच्या आजारांपासून आराम मिळतो. प्राण्यांवर केलेल्या प्रयोगांमध्ये असेही आढळून आले आहे की हळद आणि मध यांचे मिश्रण लावल्याने जळलेल्या जखमा लवकर बऱ्या होण्यास मदत होते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.