बाळ मीठ आणि साखर कधी खाऊ शकतात (फोटो सौजन्य - iStock)
लहान मुलांना काय, कधी आणि कसे खायला द्यावे यावर घरांमध्ये अनेकदा वाद होतात. आजी विशेषतः जुन्या अनुभवांवर अवलंबून असतात, तर डॉक्टर वैज्ञानिक माहितीच्या आधारे मार्गदर्शन करतात. मीठ आणि साखरेचे प्रकरणही असेच आहे. डॉक्टर स्पष्टपणे म्हणतात की मुलाला एक वर्षापर्यंत मीठ किंवा साखर देऊ नये, परंतु वृद्ध लोक अनेकदा हे मानण्यास नकार देतात.
पहिलं बाळ झाल्यावर घरातील आजी आणि नवजात आईमध्ये अथवा तिच्या सासूमध्ये असे वाद दररोज होत राहतात. साधारण सहा महिन्यानंतर बाळाला अन्नपदार्थ देण्यास सुरूवात होते. त्यानंतर या वादालाही सुरूवात होते. डॉक्टरांनी मीठ किंवा साखर देऊ नये असे निर्देश दिलेले असतात, पण मुलाच्या आजीचा असा विश्वास असतो की मुलाला चव नसलेले अन्न का आणि कसे आवडेल? तर डॉक्टरांचे म्हणणे असते की, मुलाने कधीच काही चाखलेले नसते तर चवीचा प्रश्नच कुठे येतो?
लहान मुलांच्या वाढीसाठी आहार महत्वाचा, मुलांमध्ये ‘ही’ लक्षणे दिसताच चालू करा आहार
हा वाद फक्त एकाच कुटुंबात नाही, तर प्रत्येक नवीन पालक आणि आजीमध्ये सामान्यतः दिसून येतो. तर सत्य काय आहे? डॉक्टर मीठ आणि साखरेवर इतकी कडक भूमिका घेण्याचा सल्ला का देतात ते जाणून घेऊया.
मीठ का देऊ नये?
इंडिया टुडेशी बोलताना, गुरुग्राम येथील आर्टेमिस हॉस्पिटलचे मुख्य बालरोगतज्ज्ञ डॉ. राजीव छाब्रा म्हणाले की, लहान मुलांचे मूत्रपिंड पूर्णपणे विकसित झालेले नसतात. जर त्यांना जास्त मीठ दिले तर त्यांचे शरीर ते बाहेर काढू शकत नाही आणि ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. लवकर मीठ खाल्ल्याने मुले नैसर्गिक चवीपासून दूर जातात.
नंतर, त्यांना फळे आणि भाज्या कमी आवडतात आणि खारट पदार्थ खाण्याची सवय लागते. जास्त मीठ शरीरातून कॅल्शियम देखील बाहेर टाकते, ज्यामुळे हाडे कमकुवत होऊ शकतात. डॉक्टर म्हणतात की आईचे दूध किंवा फॉर्म्युला मिल्क मुलांना पुरेसे सोडियम प्रदान करते. म्हणून, अतिरिक्त मीठाची गरज नाही.
साखर का देऊ नये?
बंगलोर येथील एस्टर सीएमआय हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार डॉ. परिमला व्ही तिरुमलेश म्हणतात की, लहान वयात साखर दिल्याने मुलाला लहानपणापासूनच गोड चवीची सवय होते. याचा परिणाम असा होतो की त्यांना फळे आणि भाज्यांसारख्या नैसर्गिक चवी कमी आवडू लागतात. साखर मुलांच्या दातांना आणि हिरड्यांनादेखील नुकसान पोहोचवू शकते, ज्यामुळे दुधाचे दात येण्यापूर्वीच पोकळी निर्माण होतात. त्यामुळे लहान बाळांना एक वर्षाच्या आत मीठ वा साखरेची गोडी वा चव लाऊ नका असाच सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.
तरीही आपल्या घरातील मोठ्या माणसांमुळे बरेचजा नवजात माता हार पत्करताना दिसतात आणि सहा महिन्यानंतर मीठ आणि साखर मुलांना देऊ लागतात आणि त्याचाच परिणाम म्हणून दात लवकर खराब होतात दिसतात.
लहान मुलांच्या मजबूत हाडांसाठी आहारात करा ‘या’ कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश