पंतप्रधान नरेंद्र मोदी नवरात्रीमध्ये नऊ दिवस करतात उपवास! दिवसातून एकदा आहारात केले जाते 'या' फळाचे सेवन
देशभरात सगळीकडे शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये महिलांसह पुरुष सुद्धा उपवास करतात. उपवासाच्या दिवशी अतिशय कमी पदार्थांचे सेवन केले जाते. काही दिवसांआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७५ वा वाढदिवस झाला. नरेंद्र मोदी देशाचे केवळ पंतप्रधान नाही तर तरुण फिटनेस आयकॉन आहेत. नरेंद्र मोदी कडक शिस्तीचे आणि योग्य आहार घेतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षीं नवरात्रीमध्ये उपवास करतात. उत्सवाच्या कालावधीमध्ये परदेश दौऱ्यावर असतात. परदेश दौऱ्यावर असूनसुद्धा उपवासाचे नियम काटेकोर फॉलो करतात. उपवासाच्या दिवशी नरेंद्र मोदी एकाच फळाचे सेवन करतात, इतर कोणत्याही पदार्थाचे अजिबात सेवन करत नाहीत. त्यामुळे मुलाखतीमध्ये आपल्या उपवासाबद्दल अधिक माहिती सांगितली आहे. उपवास केल्यामुळे आरोग्याला भरमसाट फायदे होतात.(फोटो सौजन्य: Pinterest)
अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमनच्या पॉडकास्टमध्ये बोलताना नरेंद्र मोदी यांनी सांगितल्यानुसार, नरेंद्र मोदी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये उपवास करतात. या पॉडकास्टमध्ये बोलताना त्यांनी आपल्या आयुष्याबद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे. मोदी उपवास करण्याची तयारी आधीपासूनच सुरु करतात. या दिवसांमध्ये ते पौष्टिक अन्नपदार्थ आणि भरपूर पाणी पितात. उपवास केल्यामुळे शरीरातील अवयव सक्रिय होतात आणि प्रत्येक अवयवाची चव, सुगंध चांगल्या प्रकारे ओळखण्याची ताकद मिळते.
नरेंद्र मोदी उपवासाच्या नऊ दिवसांमध्ये कोणतेही एकच फळ नऊ दिवस खातात. पहिल्या दिवशी पपई किंवा सफरचंद खाल्ल्यास संपूर्ण नऊ दिवस पपई किंवा सफरचंदच खाल्ले जाते, इतर कोणताही पदार्थ खाल्ला जात नाही.त्यांनी सांगितल्यानुसार, काही वर्षांपूर्वी ते नवरात्रीच्या दिवसांमध्ये अमेरिका दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्यासोबत मोदींची बैठक झाली. त्यावेळी ओबामा यांना समजले की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपवासादरम्यान कोणतेही पदार्थ खात नाहीत. त्यावेळी त्यांची चिंता वाढली. मोठ्या देशाच्या पंत्रप्रधानांची खातिरदारी कशी करावी, याबद्दल ते खूप विचार करू लागेल. त्यावेळी मोदी म्हणाले, जेव्हा त्यांनी मला गरम पाणी दिले तेव्हा मी त्यांना म्हणालो माझे जेवण झाले. या विधानावर ओबामा यांना गंमत वाटली. त्यानंतर ते पुन्हा एकदा अमेरिका दौऱ्यासाठी गेले तेव्हा ओबामा नरेंद्र मोदींना म्हणाले, यावेळी तुम्हाला दुप्पट खावे लागेल.