त्वचा डिटॉक्स करण्यासाठी सोप्या टिप्स
दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणावर गोड आणि तळलेल्या पदार्थांचे सेवन केले जाते. या पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे त्वचा खराब होण्यास सुरुवात होते. तेलकट गोड पदार्थ खाल्यानंतर जसा शरीरावर वाईट परिणाम दिसून येतो तसाच परिणाम त्वचेवर सुद्धा दिसून येतो. त्वचेवर सतत पिंपल्स येणे, खाज येणे, मुरूम येणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केमिकलयुक्त क्रीम्स किंवा इतर कोणतेही पदार्थ लावले जातात. पण असे करण्याऐवजी त्वचा नैसर्गिक पद्धतीने डिटॉक्स करावी. दिवाळीमध्ये रात्रीभर पार्टी आणि नातेवाईंकडे गेल्यानंतर होणाऱ्या जागरणाचा परिणाम त्वचेवरसुद्धा दिसून येतो. त्यामुळे सण उत्सवाच्या दिवसानंतर त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. खराब आणि रुक्ष झालेली त्वचा उजळ्वण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत या टिप्सचा वापर केल्यामुळे त्वचा डिटॉक्स होईल आणि पुन्हा होती तशीच होईल. यामुळे मृत त्वचा निघून जाईल आणि त्वचा स्वच्छ होण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: हिवाळ्यात घरीच बनवा होममेड बॉडी लोशन,थंडीमध्ये त्वचा राहील मुलायम आणि नितळ
त्वचा आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी शरीराला पाण्याची आवश्यकता असते. पाण्याचे सेवन केल्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. त्यामुळे दररोज कमीत कमी 7 ते 8 ग्लास पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे त्वचेमधील घाण घामावाटे निघून जाऊन त्वचा स्वच्छ होण्यास मदत होईल. त्वचा कोरडी किंवा तेलकट झाल्यानंतर त्वचेवर पिंपल्स येऊ लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे.
खराब झालेली त्वचा एक्सफोलिएट करणे गरजेचे आहे. त्वचा एक्सफोलिएट केल्यामुळे चेहऱ्यावरील घाण आणि धूळ माती निघून जाण्यास मदत होते. शिया बटर आणि ऑलिव्ह ऑइल असलेले स्क्रब वापरू शकता. या स्क्रबचा वापर केल्यामुळे त्वचा स्वच्छ होईल. आठवड्यातून एकदा त्वचा स्क्रब करणे आवश्यक आहे. योग्य पद्धतीने त्वचेची काळजी घेतल्यास त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते.
कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर किंवा इतर वेळी घरी असताना सनस्क्रीनचा वापरमे आवश्यक आहे. सनस्क्रीन लावल्यामुळे त्वचा काळी किंवा खराब होत नाही. उन्हामुळे त्वचेचे होणारे नुकसान टाळण्यासाठी नियमित त्वचेला सनस्क्रीन लावावे. अनेक महिला फळत उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेवर सनस्क्रीनचा वापर करतात, मात्र सर्वच ऋतूंमध्ये त्वचेवर सनस्क्रीनचा वापर करावा.
हे देखील वाचा: डोळ्यांच्या एलर्जीपासून कसा बचाव करता येईल? जाणून घ्या
सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी शरीराला पचेल अशा पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. आहारात पालेभाज्या, फळभाज्य, फळे, दूध, दही इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. शिवाय सकाळच्या नाश्त्यामध्ये फळांचा रस, ड्रायफ्रूट, सीड्स इत्यादी पदार्थ खावेत. काकडीमध्ये भरपूर पाणी असते जे तुमची त्वचा हायड्रेट ठेवते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. त्यामुळे सणासुदीनंतर आहारात या गोष्टी नियमित खाव्यात.