गर्भधारणा झाली असताना काय होतो हेपेटायटिसचा परिणाम (फोटो सौजन्य - iStock)
जर तुम्ही गर्भवती असाल तर पावसाळ्यात जास्त काळजी घ्या कारण हिपॅटायटीस ए आणि ई सारखे संसर्ग आई आणि बाळ दोघांसाठीही धोकादायक असू शकतात. या लेखाच्या माध्यमातून गर्भवती महिलांनी पाळल्या पाहिजेत अशा महत्त्वाच्या टिप्सवर सांगण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात हेपेटायटीस संसर्गासारख्या पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचा धोका वाढतो. गर्भवती महिलांना याचा सर्वाधीक धोका असतो. गर्भवती मातांनी या ऋतूत प्रतिबंधात्मक पाऊल उचलले पाहिजेत, कारण हेपेटायटीस, विशेषतः हेपेटायटीस ई, गर्भधारणेत गंभीर गुंतागुंत निर्माण करू शकते.
हेपेटायटीस हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे ज्यामुळे यकृताला सूज येते आणि तो प्रामुख्याने दूषित अन्न आणि पाण्याद्वारे पसरतो, जे पावसाळ्यात अधिक सामान्य असतात. हेपेटायटीस ए आणि ई सारखे संसर्ग गर्भवती महिलांसाठी चिंताजनक ठरतात, कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती आधीच कमी असते, ज्यामुळे त्यांना इतरांच्या तुलनेने संसर्गाचा धोका अधिक असतो. डॉ. पद्मा श्रीवास्तव, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल्स, लुल्लानगर, पुणे यांनी अधिक माहिती दिली आहे.
गर्भधारणेत का वाढतो धोका?
गर्भवती महिलांना, विशेषतः तिसऱ्या तिमाहीत, हिपॅटायटीस ईचा संसर्ग होण्याचा धोका असतो. यकृत निकामी होणे, अकाली प्रसूती किंवा गर्भावह दुष्परिणाम होण्याचा धोका असतो. हिपॅटायटीस ए मुळे डिहायड्रेशन, दीर्घकाळ आजार आणि उपचार न केल्यास गुंतागुंत होऊ शकते. गर्भधारणेदरम्यान, कोणत्याही विषाणू संसर्गाचा शरीरावर अधिक गंभीर परिणाम होऊ शकतो. हिपॅटायटीस संसर्गामुळे तीव्र थकवा, मळमळ आणि पोटात अस्वस्थता येऊ शकते. गर्भवती महिलांना संसर्ग झाल्यास त्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
गरोदर माता आणि न जन्मलेल्या बाळांना हेपेटायटिस बी संसर्गाचा धोका अधिक
गर्भवती महिलांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका
वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसली तर गर्भवती महिलांनी त्वरीत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
एड्सपेक्षाही धोकादायक ठरतोय हेपेटायटिस आजार, कसे ओळखाल संकेत
प्रतिबंधात्मक उपाय
गरोदरपणात वरील सर्वच बाबींची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे, आणि त्याहूनही अधिक इतर ऋतूंच्या तुलनेत पावसाळ्यात अधिक सावध राहणे गरजेचे आहे. गर्भवती माता या महत्त्वाच्या टप्प्यात हेपेटायटीस संसर्ग टाळू शकतात आणि निरोगी जीवनशैली जगू शकतात.