मित्र मैत्रिणींना पाठवा गणपती उत्सवाच्या 'या' शुभेच्छा पाठवा
भारतीय संस्कृतीमध्ये सण समारंभाना विशेष महत्व आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गणपती उत्सव साजरा केला जातो. घरोघरी बाप्पाचे आगमन झाल्यानंतर सगळीकडे एक वेगळाच उत्साह निर्माण होतो. बाप्पाच्या येण्याने संपूर्ण मुंबईनगरी आनंदीत झाली आहे. मुंबई, पुणे, कोकणात दरवर्षी मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचे स्वागत केले जाते. 11 दिवस गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करून बाप्पाला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच सगळ्याच्या मनातील सर्वच इच्छा पूर्ण होऊ देत असे गाऱ्हाणे सुद्धा घालते जाते. तसेच लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणपती बाप्पाच्या स्थापनेची सुरुवात केली होती. त्यानंतर अजूनही ही परंपरा सुरु असल्यामुळे महाराष्ट्रात सण उत्सवांना विशेष म्हत्व आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी मित्र मैत्रिणींना या खास शुभेच्छा नक्की पाठवा. तुम्ही दिलेल्या शुभेच्छा वाचून सगळ्यांचं खूप आनंद होईल.(फोटो सौजन्य-istock)
“तुम्हाला भगवान गणेशाच्या प्रेम, हास्य आणि अविरत आशीर्वादांनी भरलेल्या अप्रतिम गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा.”
गणेशाच्या आगमनाने प्रसन्न मनाने द्या आपल्या आप्तेष्टांना शुभेच्छा!
भगवान गणेशाचे दैवी अस्तित्व सदैव तुमच्या पाठीशी राहो, तुम्हाला मार्गदर्शन करत राहो,
तुमचे रक्षण करो आणि तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करो. गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!
भगवान गणेशाच्या दैवी आशीर्वादाने तुम्हाला जीवनातील आव्हानांवर मात करण्यासाठी शक्ती, धैर्य आणि बुद्धी मिळो. गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!
कोणत्याही आव्हानावर मात करण्यासाठी बाप्पा तुम्हाला नेहमी पाठबळ देवो!
हे देखील वाचा: गणपतीची स्थापना करण्यासाठी या पद्धतीने घर सजवा
या शुभ प्रसंगी, भगवान विघ्न विनायका तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करून ते आनंदाने आणि यशाने भरून टाका. गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!
गणरायच्या येण्याने सर्व दुःख दूर होऊन भरभरून आनंद मिळो हीच सदिच्छा!
गौराई तुमच्या घरात सुख, समृद्धी,
आनंद आणि भरभराट घेऊन येऊ दे
ही सदिच्छा!
गौरी आवाहनाच्या शुभेच्छा!
गौराई माते नमन करते तुला
अखंड सौभाग्य लाभू दे मला
गौरी आवाहनाच्या शुभेच्छा!
बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
गणपती बाप्पा मोरया!
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
गणपती बाप्पा मोरया!
हे देखील वाचा: Ganesh Chaturthi 2024: गणेश चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा
गणा धाव रे मला पाव रे,
तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे…
तू दर्शन आम्हाला दाव रे
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
फुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते
वंदितो तुज चरण आर्जव करतो गणराया
वरदहस्त असूद्या माथी
राहूद्या सदैव छत्रछाया
गणपती बाप्पा मोरया