महाराष्ट्र दिनानिमित्त आनंद व्यक्त करताना प्रियजनांना पाठवा 'या' गोड शुभेच्छा
संपूर्ण महाराष्ट्रात १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी, तत्कालीन बॉम्बे राज्याचे विभाजन करून स्वतंत्र महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची स्थापना करण्यात आली होती. या स्थपनेला आज ६३ वर्ष पूर्ण झाली आहेत. महाराष्ट्र दिन हा केवळ महाराष्ट्रामध्येच नाहीत गुजरातमध्ये सुद्धा मोठ्या आनंदात साजरा केला जातो. भारतात ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत देशभरातील राज्यपाल निवासांमध्ये या दोन्ही राज्यांचा स्थापना दिन साजरा केला जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्र दिनानिमित्त प्रियजनांना पाठ्वण्यासाठी काही मंगलमय शुभेच्छा सांगणार आहोत. या शुभेच्छा वाचून प्रियजनांना नक्कीच खूप जास्त आनंद होईल.महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैविध्य आणि स्वातंत्र्याला अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र दिन मोठ्या आनंदात साजरा केला जातो. (फोटो सौजन्य – iStock)
“शौर्य, स्वाभिमान, संस्कृती आणि समाजहित
हाच महाराष्ट्राचा खरा वारसा!
महाराष्ट्र दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा!”
“छत्रपतींच्या महाराष्ट्राला, ज्ञानेश्वर-तुकारामांच्या संस्कृतीला,
आणि मराठी अस्मितेला सलाम!
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!”
“गर्व आहे की मी मराठी आहे,
गर्व आहे की मी महाराष्ट्रात राहतो!
महाराष्ट्र दिनाच्या मंगलमय शुभेच्छा!”
“मराठी मन, मराठी संस्कृती, मराठी माणूस – या सर्वांचा सन्मान करणारा दिवस!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”
भावभक्तीच्या देशा
आणिक बुद्धीच्या देशा
शाहिरांच्या देशा
कर्त्यां मर्दांच्या देशा…
जय जय महाराष्ट्र देशा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
माझ्या मातीचा माझ्या महाराष्ट्राचा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा …!
पुर्नजन्म घेतला तरी महाराष्ट्रात घेईन
आणि या मातीत जन्मलेल्या
वीरांसारखा शूरवीर होईन…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
मंगल देशा
पवित्र देशा
महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा
माझा हा महाराष्ट्र देशा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा …!
दगड होईन तर सह्याद्रीचा
माती झालो तर महाराष्ट्राची
तलवार झालो तर आई भवानीची होईन
जय भवानी जय शिवाजी
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा …!
महाराष्ट्राची यशो गाथा
महाराष्ट्राची शौर्य कथा
पवित्र माती लावू कपाळी
धरणी मातेच्या चरणी माथा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
Maharashtra Day : 1 मे रोजी महाराष्ट्राची स्थापना कशी झाली? जाणून घ्या 63 वर्षांचा गौरवशाली इतिहास
जय जय महाराष्ट्र माझा..
गर्जा महाराष्ट्र माझा..
महाराष्ट्र दिन आणि कामगार
दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!