यंदाच्या अक्षय्य तृतीयेला लाडक्या प्रियजनांना पाठवा 'या' हटके शुभेच्छा
हिंदू धर्मातील प्रत्येक सणाला विशेष महत्व आहे. त्यातील सगळ्यात महत्वाचा सण म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कोणत्याही मुहूर्ताचा विचार न करता घरात शुभकार्य केले जाते. याशिवाय साडे तीन मुहूर्तांमध्ये एक असलेला विशेष मुहूर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. या दिवशी ग्रहांच्या स्थितीनुसार सगळ्यात मोठे राजयोग असतात. त्यामुळे या दिवशी घरात कोणतेही शुभ कार्य करणे समृद्धीचे आणि शांतीचे प्रतीक मानले जाते. यादिवशी लाडक्या प्रियजनांना गोड शुभेच्छा दिल्या जातात. आज आम्ही तुम्हाला लाडक्या प्रियजनांना पाठ्वण्यासाठी काही गोड शुभेच्छा सांगणार आहोत. या शुभेच्छा वाचून सगळेच आनंदी होतील.(फोटो सौजन्य – iStock)
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तुम्ही सोन्यासारखे चमका,
माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमची सर्वत्र समृद्धी होवो,
तुमच्यावर येणाऱ्या सर्व संकटांचा नाश होवो,
ऐश्वर्य आणि समृद्धीची देवी तुमच्या घरी येवो!
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी
तुम्हाला सर्व सुख प्राप्त होवो,
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा !
देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर असेल,
अक्षय्य तृतीयेला संपत्तीचे भांडार असेल.
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा !
उमा, रमा, ब्राह्मणी, तुच माता
चंद्रावर सूर्य प्रकाश होतो,
नारद मुनी गातात
जय लक्ष्मी माता, जय लक्ष्मी माता
अक्षय्य तृतीयेच्या सर्वांना शुभेच्छा !
तुमच्या घरात धनाचा वर्षाव होवो,
लक्ष्मीचा सुगंध येवो,
संकटांचा नाश होवो,
अक्षय्य तृतीया शुभ होवो.
प्रत्येक काम पूर्ण होवो,
एकही स्वप्न अपूर्ण राहू नये,
जीवन संपत्ती आणि प्रेमाने भरले जावो,
लक्ष्मीचे तुमच्या घरी आगमन होवो,
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा !
मानवता चिरंतन राहो,
मत्सराचा क्षय होवो,
प्रेमाचा विजय होवो
आणि द्वेष काळी होवो,
अक्षय्य तृतीयेच्या सर्वांना शुभेच्छा !
तुमच्या व्यवसायात वाढ होऊ देत,
तुमच्या कुटुंबात सदैव प्रेम आणि आपुलिक राहो,
संपत्तीचा वर्षाव होवो,
अक्षय्य तृतीयेचा शुभेच्छा !
सोन्याचा रथ, चांदीची पालखी,
ज्यात बसून घरी आली लक्ष्मी देवी,
तुमच्या कुटुंबाला देण्यासाठी अक्षय्य तृतीया चा हार्दिक शुभेच्छा.
तुमच्या घरावर होवो धनाची बरसात…
लक्ष्मीचा असो वास…
संकटाचा होवो नाश…
शांतीचा असो वास…
हॅपी अक्षय्य तृतीया
घन न घन जसा बरसतो ढग,
तशीच होवो धनाची वर्षा,
मंगलमय होवो हा सण,
भेटवस्तूंची लागो रांग,
अक्षय्य तृतीया शुभेच्छा
या अक्षय्य तृतीयेला..
तुम्हाला मिळो प्रत्येक आनंद..
जी इच्छा असेल ती होवो पूर्ण..
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला..
अक्षय्य तृतीया चा हार्दिक शुभेच्छा..