स्वातंत्र्य दिनानिमित्त मित्र परिवाराला पाठवा 'या' मराठमोळ्या शुभेच्छा
देशभरात सगळीकडे १५ ऑगस्ट मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. यादिवशी शाळा, कॉलेज आणि इतर सरकारी कार्यालयांमध्ये ध्वजरोहणाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या मातीतील शूर सुपुत्रांचे, क्रांतिकारकांच्या शौर्याचे, देशभक्तीचे स्मरण प्रत्येक देशवासीयासाठी हा दिवस अतिशय गर्वाचा आणि आनंदाचा आहे. यंदाच्या वर्षी ७९ वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभक्तीच्या भावना व्यक्त करण्यासाठी काही भक्तिमय आणि मराठमोळे संदेश सांगणार आहोत. हे नक्की वाचा.(फोटो सौजन्य – istock)
भारताची संस्कृती, विविध धर्म आणि निसर्ग संपदा जगातील सर्वात लोकशाही असलेल्या देशाला माझे नमन, माझ्या समस्त भारतीय बांधवांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!!
चंद्राच्या दक्षिण भागावर पोहचण्याची किमया आपल्या शास्त्रज्ञांनी केली. साऱ्या भारतीयांची मान उंचावली, भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
भारत जगात चौथी आर्थिक महासत्ता बनला, अभिमान आहे मला माझ्या देशाचा, भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
भारत नेहमीच पाकिस्तानला क्रिकेटच्या मैदाना अन् युद्धाच्या मैदानाताही लोळवतो. माझा देश महान, भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे जगात आपली छाप सोडली. सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
ऑपरेशन सिंदूर फक्त एक मोहिम नाही तर तो रक्त सांडलेल्या जवानांचे आणि निष्पाप नागरिकांच्या मृत्यूचा बदला आहे. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
माझा देश माझा अभिमान, राष्ट्रभक्ती सर्वांच्या अंगात संचारत राहो आणि हा देश उत्तरोत्तर प्रगती करत राहो. जय भारता.. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
हे स्वातंत्र्य लाखो,शहीदांच्या प्राणार्पणाने आणि संघर्ष, बलिदानाने मिळालेले आहे. महात्मा गांधी ते भगतसिंग सर्व त्या महापुरुषांना नमन. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
पाऊस पडू दे देशभक्तीचा, दिवा पेटू दे न्यायाचा, अभिमान राहू दे शूरवीरांच्या त्यागाचा, मनात दरवळत राहू दे सुगंध देशप्रेमाचा… ७९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा! जय हिंद!
भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा… स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
देश आपला सोडो न कोणी, नातं आपलं तोडो न कोणी, हृदय आपलं एक आहे, देश आपली जान आहे, ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम, त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान… स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा… स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वातंत्र्यसंग्रामात अनेकांनी बलिदान दिले, रक्त सांडले
आणि देशासाठी हसत-हसत फासावर गेले
त्यांच्या त्यागामुळे आपण आज स्वतंत्र आहोत
चला आजच्या दिवशी त्यांच्या आठवणींना वंदन करूया
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Independence Day 2025
ही माती, हे आकाश, हे स्वातंत्र्य
सहजासहजी मिळालेले नाही
शेकडो वर्षांच्या संघर्षातून हे स्वातंत्र्य मिळालंय
आपण ते व्यवस्थित जपायला हवे
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Independence Day 2025
स्वातंत्र्य म्हणजे केवळ झेंडा फडकवणे नव्हे
तर स्वाभिमानाने जगणे हे देखील स्वातंत्र्य आहे
आजच्या दिवशी देशासाठी काही तरी मोठे करण्याची प्रतिज्ञा करूया
15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा!
जय जवान, जय किसान, जय विज्ञान
या घोषणांनी प्रेरित होऊन आपण एक नवा भारत घडवूया
स्वातंत्र्य दिनाच्या लाख लाख शुभेच्छा!
देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या वीरसैनिकांना शतशः नमन
त्यांच्या त्यागाचा आपण या जगाला विसर पडू देऊ नये
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपण भारतीय आहोत, याचा अभिमान बाळगा
हा देश आपला आहे आणि आपणच त्याचे रक्षणकर्ते आहोत
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वातंत्र्याचा खरा अर्थ म्हणजे जबाबदारी
प्रत्येक नागरिकाने ती पार पाडल्यासच खरा स्वतंत्र भारत घडेल
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वातंत्र्य दिन म्हणजे केवळ एक राष्ट्रीय सण नव्हे
तर ती आपली ओळख आहे
ही ओळख जपणे हीच खरी देशभक्ती
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
भारत माता की जय!
देशभक्तीने भारलेले मन घेऊन आपले कार्य पूर्ण निष्ठेने पार पाडूया
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!