अंडरआर्म्स करणे योग्य ठरते की अयोग्य (फोटो सौजन्य - iStock)
काखेचे केस काढणे हा एक वैयक्तिक निर्णय आहे. काही लोक ते स्वच्छता आणि सौंदर्याशी जोडतात, तर काही लोक ते नैसर्गिक राहू देणे पसंत करतात. अंडरआर्म्सचे केस काढावेत की नाही यावर गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. त्याचे फायदे, तोटे आणि वैज्ञानिक कारणे जाणून घेऊया. ब्युटिशियन स्मिता कांबळे यांच्याशी आम्ही या विषयावर चर्चा केली आणि त्यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
महिलांमध्ये ही समस्या अधिक दिसून येते. सौंदर्याची व्याख्या असेल तर अनेकदा महिला महिन्याच्या महिन्याला अंडरआर्म्स वॅक्सिंग करून काखेतील केस काढून टाकताना दिसतात. स्लिव्हलेस कपडे परिधान करताना काखेत काळसर केस अजिबातच चांगले दिसत नाहीत असं अनेकांना वाटतं. मात्र नक्की काय करणं योग्य जाणून घेऊया
काखेतील केस काय असतात
काखेतील केस हे शरीराच्या नैसर्गिक वाढीचा एक भाग आहेत. हे केस यौवनकाळात हार्मोनल बदलांमुळे वाढतात. त्यांचा मुख्य उद्देश त्वचेला घर्षणापासून वाचवणे आणि शरीरातून येणारा घाम शोषून घेणे हा आहे. याशिवाय, ते शरीराची गंध टिकवून ठेवण्यात देखील महत्त्वाची भूमिका बजावतात, जे जोडीदाराला जैविकदृष्ट्या आकर्षित करण्यास मदत करू शकते. पण बरेचदा अनेकांना इतका घाम येतो की काखेतील केसांमध्ये घाम मिक्स होतो आणि दुर्गंधी येते
काखेतील केस हटविण्याचे फायदे
स्लीव्हलेस कपडे घातल्यानंतर तुमचे देखील अंडरआर्म्स काळे दिसतात? आठवडाभरात होतील गायब करा ही युक्ती
काखेतील केस न काढण्याचे फायदे
तुम्ही काय करावे?
काखेचे केस काढायचे की नाही हे पूर्णपणे तुमच्या निवडीवर आणि आरामावर अवलंबून असते. जर तुम्ही स्वच्छता, सौंदर्य आणि आरामाला प्राधान्य दिले तर केस काढणे तुमच्यासाठी योग्य असू शकते. त्याच वेळी, जर तुम्हाला नैसर्गिकरित्या जगायचे असेल आणि त्वचेचे संक्रमण टाळायचे असेल तर केस काढू नका.
काळ्या असलेल्या काखेसाठी महत्त्वाचे ‘हे’ घरगुती उपाय करा