संध्याकाळच्या नाश्त्यात भूक लागल्यानंतर सोप्या पद्धतीमध्ये बनाव मल्टीग्रेन ब्रेड सँडविच
संध्याकाळी कामावरून थकून घरी आल्यानंतर काहींना काही खाण्याची इच्छा होते. बऱ्याचदा नाश्त्यामध्ये बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. वडापाव, शेवपुरी, पिझ्झा, बर्गर इत्यादी अनेक तिखट तेलकट पदार्थ खाल्ले जातात. मात्र नेहमीच बाहेरचे पदार्थ खाणे आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत. दैनंदिन आहारात किंवा नाश्त्यात नेहमीच पौष्टिक आणि हेल्दी पदार्थ खावेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला संध्याकाळच्या नाश्त्यात मल्टीग्रेन ब्रेड सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. सँडविच हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. याशिवाय यामध्ये असलेल्या भाज्या, पनीर आरोग्य सुधारण्यास मदत करतात. मल्टीग्रेन ब्रेड इतर ब्रेडपेक्षा खूप जास्त हेल्दी आणि पौष्टिक आहे. त्यामुळे नाश्त्यात किंवा इतर ब्रेड खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही मल्टीग्रेन ब्रेड खाऊ शकता. मल्टीग्रेन ब्रेड सँडविच तुम्ही बाहेर फिरायला जाताना सुद्धा बनवून नेऊ शकता. चला तर जाणून घेऊया मल्टीग्रेन ब्रेड सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
जेवणाला येईल खमंग चव! मराठवाडी पद्धतीमध्ये झटपट बनवा खोबरं- लसूण चटणी, नोट करून घ्या रेसिपी