(फोटो सौजन्य-AI एआय)
हिंदू धर्मात शिव महादेवाचे सोळा सोमवारचे व्रत हे अतिशय फलदायी आणि पवित्र मानले जाते. सलग सोळा सोमवार सुकामेवा, फराळ, निव्वळ खडी साखर किंवा चूरम्याचा प्रसाद घेऊन उपवास केल्यानंतर १७ व्या सोमवारी किंवा इतर शुभ मुहूर्ती या व्रताची विधिवत सांगता केली जाते, त्यालाच ‘उद्यापन’ असे म्हणतात. उद्यापनाशिवाय व्रताची पूर्णता होत नाही. काही ग्रामीण ठिकाणी याला सोमवार ‘उजवणे’ असेही म्हणाले जाते.
उद्यापनाची पूर्वतयारी व आवश्यक साहित्य
उद्यापनाच्या आदल्या दिवशी घरातील पूजास्थान स्वच्छ करून घ्यावे. जर एखाद्या तीर्थस्थळी करण्याचे नियोजन असेल तर त्याप्रमाणे.
उद्यापनाचा विधी सहसा गुरुजींच्या (ब्राह्मणांच्या) मार्गदर्शनाखाली वेदोक्त किंवा शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण केला जातो.
१. लिंपण व मांडणी (स्थान शुद्धी)
पूजास्थान शेणाने किंवा स्वच्छ पाण्याने पुसून त्यावर तांदळाच्या पिठाची किंवा रांगोळीची आकर्षक रांगोळी काढली जाते (ज्याला पारंपारिक भाषेत लिंपण किंवा चौक मांडणे म्हणतात). त्यावर चौरंग किंवा पाटाची स्थापना केली जाते.
Kuldevta: कुलदैवताला चांदीचा टाक जेजुरीवरूनच का आणतात? जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि परंपरा
२. पुण्याहवाचन आणि गणेश-मातृका पूजन
पूजा यशस्वीरीत्या पार पडावी यासाठी प्रथम विघ्नहर्त्या श्री गणेशाची पूजा केली जाते. त्यानंतर पुण्याहवाचन (पवित्र जल शिंपडून वास्तू व पूजासाहित्याची शुद्धी) करून षोडश मातृकांचे पूजन केले जाते.
३. उमा-महेश्वर स्थापना
चौरंगावर तांदळाची राशी ठेवून त्यावर कलश स्थापन केला जातो. या कलशावर ‘उमा-महेश्वर’ (शिव-पार्वती) यांच्या धातूच्या किंवा मातीच्या मूर्तीची स्थापना केली जाते. आवाहनानंतर श्री उमा-महेश्वरांना पंचामृत अभिषेक, जलाभिषेक, पांढरे वस्त्र, अष्टगंध, अक्षता, पांढरी फुले आणि १०८ किंवा १००८ बेलपत्रे ‘ॐ नमः शिवाय’ किंवा ‘रुद्रसूक्ताच्या’ मंत्रोच्चारात अर्पण केली जातात.
बर्याचदा सोळा सोमवारच्या उद्यापनात १६ तांब्याचे कलश ठेवले जातात. हे आपण पूर्ण केलेल्या सलग १६ सोमवारांच्या व्रतांचे, चंद्राच्या १६ कलांचे आणि महादेवाच्या १६ रुद्रांशांचे प्रतीक मानले जाते; या कलशांमध्ये पवित्र तीर्थ आणि वरुण देवाचे आवाहन करून १६ ब्राह्मणांच्या नावाने संकल्प सोडला जातो, ज्यामुळे पूजेत प्रचंड सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन उमा-महेश्वराची पूर्ण कृपा प्राप्त होते.
४. हवन (होम-हवन विधी)
पवित्र कुंडात, पाटावर किंवा यज्ञस्थळी अग्नीची स्थापना केली जाते. महादेवाच्या ‘शिव पंचाक्षर मंत्र’ (ॐ नमः शिवाय), मृत्युंजय मंत्र आणि नवग्रहांच्या नावाने आहुती दिल्या जातात. गव्हाचा चूरमा, तीळ, तूप आणि हवन सामग्रीने मुख्य होम पूर्ण करून शेवटी पूर्णाहुती दिली जाते.
५. कथा वाचन व आरती
पूजा व हवन झाल्यानंतर सोळा सोमवार व्रताची पोथी-कहाणी भक्तिभावाने वाचली जाते. कहाणी पूर्ण झाल्यावर धूप-दीप दाखवून श्री शंकराची व आरती केली जाते आणि कापूर आरती करून देवाला क्षमायाचना केली जाते. उमा-माहेश्वाराला फुले बेल वाहिले जातात.
Shaiva vs Vaishnava: शैव आणि वैष्णव संप्रदायात नेमका काय फरक? जाणून घ्या दोन्ही परंपरांचे महत्त्व
सोळा ब्राह्मण जोडपे अन्नदान, साडी-ओटी व दान-दक्षिणा
सोळा सोमवार उद्यापनामध्ये दानाला अत्यंत विशेष महत्त्व आहे,
१. उद्यापनाच्या दिवशी बनवलेल्या चूरम्याचे मुख्यत्वे तीन भाग केले जातात, ( बरेच जन निव्वळ खडीसाखरे वर निरंक उपास करतात. त्यांनी खडीसाखर म्हणून हा प्रसाद घेतला तरी चालतो.)
अशा रीतीने विधीवत, भावपूर्ण आणि शास्त्रोक्त पद्धतीने सोळा सोमवारचे उद्यापन केल्याने भगवान श्री उमा-महेश्वराची कृपा प्राप्त होते, घरातील सर्व संकटे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे.
( नोट: नवराष्ट्र या विधी, पूजा आणि परंपरांची पूर्णपणे पुष्टी करू शकत नाही. तज्ञांचे मार्गदर्शन घेणे यासाठी अपरिहार्य ठरेल.)






