• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Solapur Local Fort Horror Story

Horror Story: दूर किल्ल्यावरून माझ्याकडे पाहत होती… मोकळे केस, लालभडक वेश! मागेमागे घरात आली

सोलापूर जिल्ह्यात दहावीला शिकणाऱ्या राजवीरला रात्री अभ्यासासाठी शाळेत जाताना किल्ल्याजवळ लाल वेशातील एक अनोळखी महिला दिसली. अन्...

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 03, 2026 | 07:23 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • त्याची नजर दूरवर असलेल्या किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे गेली
  • शाळेला डावीकडून वळसा घालत तो घरी जात असतानाच…
  • किल्ल्याकडून येताना तिचे केस बांधलेले होते, हे त्याला स्पष्ट आठवत होते
सोलापूर जिल्ह्यातील एका लहानशा गावात ही थरारक घटना घडली. ही घटना घडून अनेक वर्षे उलटली असली, तरी तिची धास्ती आजही राजवीरच्या मनात घर करून आहे. सध्या राजवीर मुंबईत वास्तव्यास आहे; मात्र त्याचे संपूर्ण शिक्षण खेडेगावातच झाले. दहावीच्या वर्षात घडलेला हा प्रसंग त्याच्या आयुष्यातील सर्वात भयानक अनुभव ठरला.

Horror Story: त्यांनी घर सोडले अन् सुरु झाला मृत्यूचा काळ! दशकांपासून घरातचं फिरत होते पण…

त्या काळी गावात वीजपुरवठा नियमित नव्हता. अनेक घरांमध्ये दिवा नसल्याने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळेने एक वेगळी सोय केली होती. रात्री अभ्यास करू इच्छिणाऱ्या मुलांसाठी शाळेतील एक वर्ग संपूर्ण रात्र खुला ठेवण्यात येत असे. घर लहान असल्याने आणि घरच्यांना त्रास होऊ नये म्हणून राजवीरसह ३-४ मित्र दररोज रात्री शाळेत जाऊन अभ्यास करत असत. त्या दिवशीही सगळे मित्र जेवण करून रात्री दहाच्या सुमारास शाळेकडे निघाले. सुरुवातीला सगळं अगदी नेहमीसारखंच होतं. अभ्यास चालू होता. मात्र बराच वेळ बसून राजवीरला कंटाळा आला. तो थोडा वेळ शाळेच्या मैदानात फेरफटका मारायला बाहेर आला. तेव्हा त्याची नजर दूरवर असलेल्या किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे गेली.

रात्रीचे साडेबारा वाजले होते. अंधारात किल्ल्याच्या दिशेने पाहताना त्याला लालभडक लुगड्यात एक महिला उभी असल्याचे दिसले. “या वेळी ही बाई इथे काय करत असेल?” असा विचार त्याच्या मनात आला. कदाचित शेजारच्या गावातून चालत येत असेल, असे त्याला वाटले. त्या काळी वाहनांची सोय नव्हती; लोक पायीच प्रवास करत.

थोड्याच वेळात ती महिला हळूहळू गावाच्या दिशेने चालू लागली. राजवीर पुन्हा वर्गात परतला; मात्र बाहेर जाण्याआधी त्याने पुन्हा एकदा तिच्याकडे पाहिले. आता ती शाळेच्या गेटजवळ येऊन थांबली होती… आणि थेट राजवीरकडे पाहत उभी राहिली होती. काही क्षण दोघांचेही डोळे एकमेकांत खिळले. अचानक ती महिला शाळेच्या उजव्या बाजूला वळून नजरेआड झाली.

पंधरा मिनिटांत अभ्यास संपवून सगळे मित्र मागच्या दाराने घराकडे निघाले. राजवीर मात्र सगळं आवरून, दिवे बंद करून पुढच्या दाराने बाहेर पडला, जिथे आधी ती महिला उभी होती. घड्याळात एक वाजला होता. शाळेला डावीकडून वळसा घालत तो घरी जात असतानाच… अचानक ती महिला त्याच्या समोर उभी राहिली. लालभडक वेश, रागीट डोळे आणि मोकळे केस… किल्ल्याकडून येताना तिचे केस बांधलेले होते, हे त्याला स्पष्ट आठवत होते. अंगावर काटा आला; मात्र राजवीर न डगमगता तिच्या बाजूने न बोलता पुढे निघून गेला.

Horror Story: रस्त्याच्या कडेला म्हातारी अंधारात हातवारे लागली करू! म्हणाली ‘बोला था ना, वहा मत जा’ गोव्याच्या स्मशानात…

तो मामाकडे राहत होता. दार ठोठावल्यावर मामा दार उघडून त्याला आत घेतले. दार बंद झाले, तरी राजवीरची नजर दाराकडेच खिळलेली होती. “ती माझ्यामागे आली नसेल ना?” या विचाराने त्याचे हात थरथरत होते. दाराच्या एका भेगातून त्याने बाहेर डोकावले… आणि त्याच क्षणी त्याच्या अंगातील त्राण गेले. ती महिला घराबाहेर उभी होती… आणि त्याच भेगातून थेट घरात पाहत होती. भीतीने राजवीर खाली कोसळला. मात्र त्या रात्री त्याने ही घटना कुणालाही सांगितली नाही. आश्चर्य म्हणजे, त्यानंतर त्या गावात किंवा राजवीरच्या आयुष्यात अशी कोणतीही घटना पुन्हा घडली नाही. पण आजही त्या लाल वेशातील स्त्रीचा चेहरा, ते रागीट डोळे आणि दाराच्या भेगेतून केलेली नजर राजवीरच्या आठवणींमध्ये जिवंत आहेत.

टीपः हा लेख केवळ मनोरंजन आणि माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्याचा Navarashtra.com चा हेतू नाही. 

Web Title: Solapur local fort horror story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2026 | 07:23 PM

Topics:  

  • horror story
  • Konkan
  • Solapur

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Feb 19, 2026 | 07:45 PM
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

Feb 19, 2026 | 07:40 PM
बॉलिवूडच्या अभिनेत्याने ‘बेस्ट अ‍ॅक्ट्रेस’चा अवॉर्ड मिळवत रचला होता इतिहास, फ्रान्समध्ये दुमदुमला होता टाळ्यांचा आवाज!

बॉलिवूडच्या अभिनेत्याने ‘बेस्ट अ‍ॅक्ट्रेस’चा अवॉर्ड मिळवत रचला होता इतिहास, फ्रान्समध्ये दुमदुमला होता टाळ्यांचा आवाज!

Feb 19, 2026 | 07:39 PM
16 लाखांची Maruti e Vitara वर 13 लाखांचं लोन, कसा असेल EMI चा हिशोब? जाणून घ्या

16 लाखांची Maruti e Vitara वर 13 लाखांचं लोन, कसा असेल EMI चा हिशोब? जाणून घ्या

Feb 19, 2026 | 07:28 PM
Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Feb 19, 2026 | 07:26 PM
Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Feb 19, 2026 | 07:22 PM
भारताच्या शेजारी तुर्कीचा मोठा गेम! कट्टरपंथीयांच्या पाठिंब्यासाठी ज्युनियर एर्दोगान बांगलादेशात? नेमकं काय शिजतंय?

भारताच्या शेजारी तुर्कीचा मोठा गेम! कट्टरपंथीयांच्या पाठिंब्यासाठी ज्युनियर एर्दोगान बांगलादेशात? नेमकं काय शिजतंय?

Feb 19, 2026 | 07:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग

Feb 19, 2026 | 03:22 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Feb 18, 2026 | 03:10 PM
Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Feb 18, 2026 | 03:07 PM
Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Feb 18, 2026 | 03:04 PM
NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

Feb 18, 2026 | 02:22 PM
MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Feb 18, 2026 | 02:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.