३० ऑक्टोबर घटना - दिनविशेष आंतरराष्ट्रीय ऑर्थोपेडिक परिचारिका दिन २०१३: सचिन तेंडुलकर आपल्या कारकिर्दीतील शेवटचा रणजी सामना खेळला. १९९५: कॅनडातील क् वेबेक प्रांताने विभक्त होण्यासाठी घेतलेल्या सार्वमतात जनतेने ५०.६% विरुद्ध ४९.४% मतांनी कॅनडातच राहण्याचा निर्णय दिला. १९७३: इस्तंबुलमधील बॉस्पोरस पूल पूर्ण झाल्यामुळे युरोप आणि आशिया जोडले गेले. १९६६: शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला. १९४५: भारताला संयुक्त राष्ट्रांचे (United Nations) सदस्यत्त्व मिळाले. १९२८: लाहोर येथे सायमन कमिशनचा निषेध करणाऱ्या लाला लजपतराय यांच्यावर ब्रिटिश पोलिसांनी लाठीहल्ला केला. १९२०: सिडनी येथे कम्युनिस्ट पार्टी ऑफ ऑस्ट्रेलियाची स्थापना. ३० ऑक्टोबर जन्म १९६०: डिएगो मॅराडोना - अर्जेंटिनाचे फूटबॉलपटू १९५१: त्रिलोक गुर्टू - भारतीय ड्रमर आणि गीतकार १९४९: प्रमोद महाजन - केंद्रीय मंत्री व राज्यसभा खासदार १९३२: बरुन डी - भारतीय इतिहासकार आणि लेखक १९२९: आर. एस गवई - भारतीय वकील आणि राजकारणी १९०९: होमी जहांगीर भाभा - भारतीय भौतिकशास्त्रज्ञ - पद्म भूषण १८८७: सुकुमार रॉय - बंगाली साहित्यिक १८७८: आर्थर शेर्बियस - एनिग्मा मशीनचा शोध लावणारे जर्मन विद्युत अभियंते १७३५: जॉन ऍडॅम्स - अमेरिकेचे २रे राष्ट्राध्यक्ष ३० ऑक्टोबर निधन २०११: अरविंद मफतलाल - उद्योगपती २००५: शम्मीशेर सिंह शेरी - भारतीय राजकारणी १९९८: विश्राम बेडेकर - लेखक व दिग्दर्शक १९९६: भाऊ पाध्ये - लेखक, पत्रकार १९९४: स्वर्ण सिंग - केंद्रीय मंत्री सरदार १९९०: व्ही. शांताराम - चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते १९९०: विनोद मेहरा - अभिनेते १९७४: बेगम अख्तर - गझल, दादरा आणि ठुमरी गायिका - पद्म भूषण, पद्मश्री १९१०: हेनरी डूनेंट - रेड क्रॉस संस्थेचे सहसंस्थापक १८८३: दयानंद सरस्वती - आर्य समाजाचे संस्थापक, तत्त्वज्ञ व विद्वान