युनिकाँपार्टमेंटल नी आर्थ्रोप्लास्टी किंवा युनिकॉन्डायलर नी आर्थ्रोप्लास्टी अत्याधुनिक तंत्रज्ञान
मुंबई: राज्य सरकार संचालित जे जे रुग्णालय आपला 180 वा वर्धापन दिन साजरा करत असताना, जे जे रुग्णालयाच्या नावावर रुग्णांच्या उपचाराशी संबंधित आधुनिक कामगिरीही जोडली जात आहे. याबाबत जे जे रुग्णालयाने आणखी एक यश संपादन केले आहे. रुग्णालयात पहिल्यांदाच महिलेचा अर्धा गुडघा बदलण्यात आला आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने करण्यात आलेल्या या शस्त्रक्रियेमुळे ही महिला लवकरच चालण्यास सुरुवात करणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, मुंबईतील रहिवासी असलेल्या हीराबाई नावाच्या 50 वर्षीय महिलेला एका वर्षाहून अधिक काळ डाव्या पायाच्या गुडघ्याच्या एका भागात वेदना होत होत्या. वेदना इतकी असह्य होती की या महिलेला चालणे कठीण झाले. कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी जेजे रुग्णालयात आणले. रुग्णालयाच्या अस्थिव्यंग विभागाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
हे देखील वाचा: साखरेचे अतिसेवन आरोग्यासाठी ठरेल हानिकारक, ‘ही’ लक्षणे दिसताच वेळीच व्हा सावध
हॉस्पिटलच्या ऑर्थोपेडिक विभागाचे प्रमुख डॉ.नादिर शाह यांनी सांगितले की, तपासणीदरम्यान महिलेच्या गुडघ्याचा एक भाग खराब झाल्याचे आढळून आले हाेते. महिलेचे वय लक्षात घेऊन तिच्या गुडघ्याचा खराब झालेला भाग बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी एक नवीन तंत्र वापरण्यात आले, ज्याला वैद्यकीय भाषेत युनिकाँपार्टमेंटल नी आर्थ्रोप्लास्टी किंवा युनिकॉन्डायलर नी आर्थ्रोप्लास्टी असेही म्हणतात. गुडघ्याचा एकच भाग सदोष असताना ही शस्त्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेमध्ये, खराब झालेले हाड काढून टाकले जाते आणि त्या भागात कृत्रिम सांधे (प्रोस्थेटिक) बसवले जातात. या तंत्राद्वारे महिलेचा गुडघा अर्धवट बदलण्यात आला. जेजे रुग्णालयात पहिल्यांदाच अर्धा गुडघा बदलण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे.
यात रुग्णाला वेदनाही कमी होतात. अर्धवट गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया खूप प्रभावी आहे. विशेषत: तारुण्यात, जेव्हा सांधे खराब होतात, तेव्हा खराब झालेला भाग गरजेनुसार बदलला जातो. नवीन तंत्रज्ञानाने संपूर्ण गुडघ्याची ओपन सर्जरी करण्याऐवजी फक्त सांधे खराब झालेला भाग बदलता येताे. त्यामुळे रुग्णाची प्रकृतीही लवकरात लवकर ठीक होते आणि काही वेळातच तो चालण्यास सक्षम होतो. या शस्त्रक्रियेमध्ये कमी रक्तस्त्राव होतो आणि गुडघा लवकरात लवकर बरा हाेताे. या सर्जरीला खासगी रुग्णालयात चार ते पाच लाख खर्च येताे पण जे.जे. रुग्णालयात महात्मा ज्याेतिबा फुले आरोग्य याेजनेतून शस्त्रक्रिया करण्यात येते – डॉ. नादिर शाह (प्रमुख अस्थिव्यंग विभाग, जे.जे. रुग्णालय)
हे देखील वाचा: आंघोळ करताना या 5 चुका चुकूनही करू नका..
जे.जे. रुग्णालय 180 व्या वर्धापन वर्ष साजरे करत आहेत. यात अस्थिव्यंग विभागात अत्याधुनिक तंत्रज्ञानेने केलेली शस्त्रक्रियाही जे.जे. रुग्णालयासाठी अभिमानास्पद बाब आहे. जे.जे. रुग्णालयात राज्याच्या कानाकाेपऱ्यातून रुग्ण उपचारासाठी दाखल हाेत असतात. या रुग्णांना येाग्य व अत्याधुनिक उपचार मिळावेत यासाठी रुग्णालय प्रशासना कटीबद्ध आहे – डाॅ. पल्लवी सापळे ( अधिष्ठाता जे.जे. रुग्णालय)