तापत्या उन्हात शरीर थंड ठेवण्यासाठी रूजुता दिवेकरांनी सांगितले 'हे' थंडगार पदार्थ
उन्हाळ्यात तापमानात वाढ झाल्यानंतर शरीराला थंडाव्याची आवश्यकता असते. कारण वातावरणात झालेल्या बदलांचा परिणाम दैनंदिन आरोग्यावर लगेच दिसून येतो. ऊन वाढल्यामुळे अचानक चक्कर येणे, उच्च रक्तदाब किंवा मळमळ होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीर थंड ठेवण्यासाठी उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात. याशिवाय शरीर निरोगी राहते. उन्हाळ्यात आरोग्य चांगले आणि निरोगी ठेवण्यासाठी आहारात थंड पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. थंड पदार्थांच्या सेवनामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन शरीरात पाणी टिकून राहते.(फोटो सौजन्य – iStock)
नजर अंधुक झाली आहे? सतत डोळे दुखतात? मग आठवड्यातून एकदा करा ‘या’ भाजीचे सेवन, नजर होईल तीक्ष्ण
वातावरणात बदल झाल्यानंतर आरोग्याला हानी पोहचणार नाही, अशा गोष्टी करणे टाळले पाहिजे. अन्यथा आरोग्य बिघडू शकते. न्यूट्रिशनिस्ट रूजुता दिवेकर या त्यांच्या इन्स्टाग्रामवर आरोग्यासंबंधित काहींना काही टिप्स आणि पदार्थ शेअर करत असतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीर थंड ठेवण्यासाठी ऋजुताने सांगितलेल्या पदार्थांबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीर थंड ठेवण्यासाठी बेलाच्या फळाचा रस प्यावा. बेलाच्या फळाचा रस पिणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. या रसाचे सेवन केल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि आरोग्य सुधारते. या फळामध्ये असलेला नैसर्गिक गोडवा आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतो. हे नैसर्गिक हायड्रेटिंग ड्रिंक आहे. यामध्ये टॅनिन, फ्वेवोनॉइड्स, क्यूमरिन सारखे अॅंटी-इन्फ्लामेटरी, विटामिन ए, सी आणि फायबर इत्यादी अनेक घटक आढळून येतात. याशिवाय शरीरातील इन्फेशनचा धोका कमी होतो.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात अनेक वेगवेगळी फळे उपलब्ध असतात. त्यामुळे या दिवसांमध्ये हंगामी फळांचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. या फळांमध्ये प्रीबायोटिक आणि प्रोबायटिकचे गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे रोजच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या वेळी ताज्या फळांचे सेवन करू शकता.
बदाम खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. बदाम हे एक सुपरफूड आहे. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नियमित भिजवलेले ५ बदाम खावेत. याशिवाय तुम्ही बदाम दूध किंवा त्यापासून तयार केलेल्या पदार्थांचे सेवन करू शकता. बदाम थंड असतात. याशिवाय बदामामध्ये कॅल्शियम, फायबर, विटामिन इत्यादी अनेक घटक आढळून येतात.
उन्हाळ्यात ताक पिण्यास जास्त प्राधान्य द्यावे. ताक शरीरासाठी अतिशय गुणकारी आहे. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी दुपारच्या वेळी एक ग्लास ताक पिण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स शरीर थंड ठेवण्यासाठी मदत करतात. तसेच लिव्हर आणि आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी ताक प्यावे.