(फोटो सौजन्य – istock)
दिवसाची सुरुवात शांतपणे करा
सकाळी घाईगडबड न करता दिवसाची सुरुवात शातपणे करा, काही मिनिटे खोल श्वास ध्या हलके स्ट्रेचिंग करा किंवा शांत बसून स्वतः सौबत वेळ घालवा, अशी सुरुवात मनातील गोंधळ कमी करते आणि दिवसातील ताण हाताळण्यासाठी मन तयार करते.
खोल श्वसनाचा सराव करा
चिंता वाढली की खोल श्वसन हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय ठरतो. नाकाने हळू श्वास घ्या, काही सेकंद थांबा आणि तोंडाने शांतपणे श्वास सोडा. दिवसातून पाच मिनिटे असा सराव केल्यास ताण कमी होतो आणि लगेच हलके वाटू लागते.
नियमित हालचाल ठेवा
व्यायाम हा नैसर्गिक तणावनाशक आहे. यासाठी जड व्यायाम करण्याची गरज नाही. चालणे, योग, नृत्य किंवा साधे स्ट्रेचिंगसुद्धा उपयोगी ठरते. रोज २० ते ३० मिनिटांची हालचाल मन प्रसन्न ठेवते आणि ऊर्जा वाढवते.
स्क्रीन टाइम मर्यादित ठेवा
सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्स, सोशल मीडियावर स्क्रोलिंग आणि स्क्रीनकडे पाहणे यामुळे नकळत चिंता वाढते. झोपण्यापूर्वी मोबाईल टाळणे, मधूनमधून डिजिटल ब्रेक घेणे आणि ऑफलाइन आवडत्या गोष्टी करणे आवश्यक आहे. मनालाही विश्रांतीची गरज असते,
पुरेशी झोप घ्या
झोपेची कमतरता ताणतणाव आणि चिंता वाढवू शकते, ठराविक वेळेला झोपणे, रात्री उशिरा कॅफिन टाळणे आणि झोपण्यापूर्वी शांत करणारी दिनचर्या ठेवणे फायदेशीर ठरते. चांगली झोप मेंदूला नव्याने ताजेतवाने करते.
सजगपणे आहार घ्या आणि पाणी प्या
आपण काय खातो त्याचा आपल्या मानसिक आरोग्यावर थेट प्रभाव पडतो. फळं, भाज्या, संपूर्ण धान्य आणि भरपूर पाणी यांचा समतोल आहार मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. जास्त कॅफिन आणि साखर असलेले पदार्थ टाळल्यास अस्वस्थता कमी होऊ शकते.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






